पश्चिम महाराष्ट्र

अवैधरित्या प्राणी-पक्षी ठेवल्याप्रकरणी कारवाई; वनविभागाचा छापा

शैलेश पेटकर

सांगली : मिरजेतील (miraj) एका रेस्क्यू सेंटरवर वन्यप्राणी व पक्षी अवैधरित्या ठेवल्याप्रकरणी वनविभागाने (forest department)छापा टकला. २६ घारी (एक मृतावस्थेत), घुबड, गाय बगळा, कांडे करकोचा दोन, माकड दोन, कासव चार या प्राण्यांचा त्यात समावेश होता. वनविभागाने ते प्राणी ताब्यात घेतले आहेत. आज सकाळी आठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

अधिक माहिती अशी, की मिरजेतील पार्श्‍वनाथनगर येथील रेस्क्यू सेंटरवर अवैधरित्या प्राणी बाळगल्याची माहिती वनविभागास मिळाली. त्यानुसार आज फिरत्या पथकाने सेंटरवर छापा टाकला. त्यावेळी ३७ प्रकारचे वन्य पक्षी आणि प्राणी दिसून आले. त्यांपैकी एक घार मृतावस्थेत मिळून आली. पशुसंर्वधन सर्व चिकित्सालयातील डॉ. सुतार, डॉ. डोके यांच्या टीने प्राणी व पक्ष्यांची वैद्यकीय तपासणी केली. बरेच प्राणी व पक्षी तंदरूस्त असून काही पक्ष्यांची प्रकृती खालावल्याचे दिसून आले. अशा प्राणी-पक्ष्यांना पुण्यातील वन्यप्राणी रेस्क्यू सेंटरवर पाठविण्यात येणार असल्याचे वनविभागाने सांगितले.

उपवनसंरक्षक विजय माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक विजय गोसावी, वनक्षेत्रपाल युवराज पाटील यांच्यासह वनमजुरांचा कारवाईत सहभाग होता. वन्य प्राणी, पक्षी जखमी अवस्थेत आढळल्यास वन विभागाशी संपर्क करावा. कोणत्याही वन्यजीवास विनापरवाना बाळगणे कायद्याने गुन्हा असून असे दिसून आल्यास वन्यजीव अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपवनसंरक्षक माने यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT