पश्चिम महाराष्ट्र

तुंग येथे कृष्णेत पुन्हा मगरीचे दर्शन

सकाळवृत्तसेवा

तुंग - येथील कृष्णा नदीमध्ये शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास खडकावर जबडा आवासून विसावलेल्या मगरीचे पुन्हा दर्शन झाल्याने गावात भीती पसरली आहे. 

मौजेडिग्रज मधील घटनेला ४८ तास होत नाही तोवर (तुंग, ता. मिरज) येथे मगर चक्क सावजावर लक्ष ठेवताना दिसून आली. यावेळी सावज नदीतील अंघोळ करणाऱ्या मुलाऐवजी कावळा होता एवढाच फरक.  मागील महिन्यात सलग दोन दिवस १२ फूट मगर नदीत  व पात्राबाहेर दिसली होती. आज पुन्हा तिचे दर्शन झाले. नदीला अंघोळीला गेलेल्या मुलांनी मगर दिसताच भीतीने पळ काढला. यावेळी कृष्णाकाठावर वनविभागाचे वनपाल आर. एस. पाटील यावेळी बंदोबस्ताला होते.

दुपारी नदीला पोहायला गेलेल्या युवकांनी केलेल्या गोंगाटामुळे मगर पाण्यात निघून गेली. काही युवकांनी तिचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकले होते. मोठी मगर पाहून नदीला जाणाऱ्या ग्रामस्थांच्यामध्ये घबराट पसरली आहे. 

दिवसभरात नदीपात्रात व बाहेर मगर आल्याने मौजेडिग्रज येथे लहान मुलाला ओढून नेल्‍याची व त्‍यात त्‍याच मृत्‍यू झाल्‍याची घटना ताजी असल्‍यामुळे त्‍याच घटनेची चर्चा गावात सुरू झाली. नदीवर येणाऱ्या ग्रामस्थांना व पोहायला येणाऱ्या युवकांना  नदीवर न जाण्याच्या सूचना घरातील मंडळी देत होते. कसबेडिग्रज ते तुंग या टप्प्यात कृष्णा नदीत मगरीची संख्या वाढल्याने हल्ल्याचे व मगर दर्शनाचे प्रमाण  वाढले आहे. वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मनुष्य वर्दळीच्या भागात उपाय योजना करावी, अशी मागणी होत आहे. 

दरम्‍यान, कृष्‍णा नदी पात्रात वारंवार दर्शन होत असल्‍यामुळे काठावरील गावांतील ग्रामस्‍थांनी काळजी घ्‍यावी, असे आवाहन वनविभाने केले आहे.

मगरीचे दर्शन वारंवार होत असल्याने कृष्णानदी काठावरील ग्रामस्थांनी काळजी घ्यावी.
- आर. एस. पाटील,
वनपाल, वनविभाग सांगली

तुंग येथील पाणवठा मगरीच्या वावरापासून संरक्षित करण्याची गरज आहे. यासाठी वनविभागाकडे जाळी बसवण्याची मागणी करणार आहे.
- जयश्रीताई डांगे,
पंचायत समिती सदस्या, तुंग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SCROLL FOR NEXT