RAMNAVMI CRAUD 
पश्चिम महाराष्ट्र

शिर्डीतील रामनवमी उत्सवात झालेल्या "गर्दी'ची चौकशी! 

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी : साईबाबा संस्थानातर्फे यंदाचा रामनवमी उत्सव भाविकांविना साजरा करण्यात आला; मात्र या उत्सवात संस्थान अधिकाऱ्यांनी शासनाच्या आदेशाच्या तुलनेत जास्त लोकांना एकत्र केले, त्याचे फोटोसेशन करत ते व्हायरल केले, अशी तक्रार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना प्राप्त झाली आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार साईबाबा संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्याकडून या प्रकरणी माहिती मागवण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक दीपक गांधले यांनी ही माहिती दिली. 

गांधले म्हणाले, की साईमंदिरात दैनंदिन पूजाअर्चा करण्यास मुभा आहे. याव्यतिरिक्त उत्सव साजरा करण्यास मनाई होती. परंतु साईबाबा संस्थानातर्फे साईमंदिरात रामनवमी उत्सवाच्या पूर्वसंध्येला मंदिर प्रशासनाच्या वतीने पारंपरिक पूजाअर्चा करून जास्त लोकांना एकत्र करून सोशल डिस्टन्सिंग न पाळता फोटोसेशन केले आणि ते व्हायरल केल्याची तक्रार वरिष्ठ कार्यालयात प्राप्त झाली होती. दरम्यान, वरिष्ठांच्या आदेशानुसार संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्याकडून माहिती मागवली आहे. 

दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी याबाबतची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पोलिस महासंचालक यांच्याकडे केली होती, असे समजते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: आधी शमीने धक्के दिले अन् मग नितीश रेड्डी-क्लासेनने LSG च्या गोलंदाजांना फोडलं; SRH चा १५० धावांचा टप्पा पार

२० वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं हाताची नस कापली, मनगटावर १८ वेळा वार; का उचललं टोकाचं पाऊल

Pune Crime: पुण्यात १७ वर्षीय तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, २१ वर्षीय तरुणानं फोटो व्हायरल करण्याची दिली होती धमकी!

Jawkheda Thombre farm fire: जवखेडा ठोंबरे येथे शेतकऱ्याच्या शेडला भीषण आग; ज्वारी कडबा, भुस व औजारे जळून सुमारे ३ लाखांचे नुकसान

Latur sandalwood smuggling news: लोहा-चाकूर परिसरात भाजीपाल्याच्या कॅरेटमध्ये लपवलेले ३६.७५ लाखांचे चंदन जप्त; तिघांना अटक, ५१.९६ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

SCROLL FOR NEXT