Crowds at water ATMs due to unclean water supply 
पश्चिम महाराष्ट्र

कारखाना परिसरात अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे वॉटर एटीएमवर गर्दी 

घनश्‍याम नवाथे

सांगली : शहर आणि परिसरात झालेल्या पावसाचा परिणाम म्हणून साखर कारखाना व परिसरात तीन दिवसापासून अशुद्ध पाणीपुरवठा होऊ लागला आहे. नदी पात्रातील पाणी वाढ आणि माळ बंगला येथील जलशुद्धीकरणातील तांत्रिक अडचणीमुळे अशुद्ध पाणीपुरवठा होत असून दोन-तीन दिवसात पाणी पुरवठा शुद्ध होईल असे सांगण्यात आले. परंतू सध्या किरकोळ आजार देखील धोकादायक असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर एटीएमसमोर गर्दी दिसू लागली आहे. 

सांगली परिसराला दोन-तीन दिवसापासून जोरदार पावसाने झोडपले आहे. पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. नदीला जोडणारे ओढे, नाले भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी थोडीसी वाढली आहे. पावसानंतर वाहून आलेल्या पाण्यामुळे नदीतील पाणी गढूळ बनले आहे. पाणी वाढल्यामुळे माळ बंगला येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शुद्धीकरण प्रक्रिया नेहमीच्या वेगाने होत नाही. त्यामुळे अशुद्ध पाणी पुरवठा गेल्या तीन दिवसापासून साखर कारखाना आणि संपूर्ण परिसराला होऊ लागला आहे. पाणी गढूळ आणि दुर्गंधीयुक्त नसले तरी अशुद्ध असून रंग बदललेला दिसतो. 

सध्या कोविड आपत्तीच्या काळात खासगी दवाखाने अनेक ठिकाणी बंद आहेत. किरकोळ आजारावर गोळ्या औषधे घेणे देखील अवघड बनले आहे. दवाखाने बंद असल्यामुळे अनेकजण थेट मेडिकल दुकानात जात आहेत. तसेच महापालिकेच्या दवाखान्यात देखील गर्दी होत आहे. किरकोळ आजारा अशावेळी अशुद्ध पाणी पिऊन आजारी पडण्याचा धोका पत्करण्यास कोणी तयार नाही. सध्या मिळणारे पाणी उकळून पिण्यायोग्य नाही. त्यामुळे आजारी पडण्यापेक्षा विकतचे पाणी आणलेले बरे म्हणून वॉटर एटीएमसमोर गर्दी दिसत आहे. वॉटर एटीएममधून पाच आणि दहा रूपयाला 20 लीटर पाणी विकत मिळते. दोन-तीन दिवसात शुद्ध पाणीपुरवठा होईल असे पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात आले. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: आधी शमीने धक्के दिले अन् मग नितीश रेड्डी-क्लासेनने LSG च्या गोलंदाजांना फोडलं; SRH चा १५० धावांचा टप्पा पार

२० वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं हाताची नस कापली, मनगटावर १८ वेळा वार; का उचललं टोकाचं पाऊल

Pune Crime: पुण्यात १७ वर्षीय तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, २१ वर्षीय तरुणानं फोटो व्हायरल करण्याची दिली होती धमकी!

Jawkheda Thombre farm fire: जवखेडा ठोंबरे येथे शेतकऱ्याच्या शेडला भीषण आग; ज्वारी कडबा, भुस व औजारे जळून सुमारे ३ लाखांचे नुकसान

Latur sandalwood smuggling news: लोहा-चाकूर परिसरात भाजीपाल्याच्या कॅरेटमध्ये लपवलेले ३६.७५ लाखांचे चंदन जप्त; तिघांना अटक, ५१.९६ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

SCROLL FOR NEXT