पश्चिम महाराष्ट्र

सातबारा नावे लावण्यासाठी दलित समाजाचे आंदोलन

सकाळवृत्तसेवा

आटपाडी - सातबाऱ्यावर नावे लावण्यासाठी येथील दलित समाजाने बेमुदत उपोषण सुरु केले आहे. 1950 साली येथील 428 एकर डबई कुरण दलित समाजाला देण्यात आले होते. पण या जमिनीवर अद्यापही त्यांची नावे नाहीत यासाठीच तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येत आहे. 

येथील दलित समाजातील लोकांना डबई कुरणातील सरकारच्या मालकीची 428 एकर जमीन मेहनत मशागत करण्यासाठी दिलेली आहे. 1956 मध्ये कब्जेपट्टी तयार करण्यात आली. 1962 मध्ये कायमस्वरूपी कब्जेपट्टी देण्यात आली. 1969 मध्ये 67 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन महार सामुदायिक सहकारी संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत सर्व क्षेत्राचे लाभधारक शेती कसत होते. 1972 च्या दुष्काळात शेती उद्ध्वस्त झाली. त्यामुळे संस्थेचेही काम बंद पडले. ही संस्था अवसायनात निघाली. त्यानंतर जमीन करणाऱ्या 67 सभासद शेतकऱ्यांची नावे सात - बारावर लावण्याचा अहवाल 1992 मध्ये तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि जिल्हा उपनिबंधकांनी दिला मात्र याची गेल्या सत्तावीस वर्षात अंमलबजावणी झालेली नाही.

या अंमलबजावणीसाठी अनेक दिवसापासून प्रयत्न चालू होते मात्र न्याय मिळत नसल्यामुळे दलित समाजाने तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. यात विलास खरात, यशवंत मोटे, बाबा खरात, आप्पा खरात, अशोक मोटे, नंदकुमार खरात, हरी मोटे, रमेश मोटे, महादेव खरात आदी सहभागी झाले आहेत. या उपोषणाला काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डी. एम.पाटील, भारिप बहुजन महासंघ यांनी पाठिंबा दिला आहे.    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT