Dead fish near Ramalinga Island; Contaminated water flows into the river 
पश्चिम महाराष्ट्र

रामलिंग बेटाजवळ मृत माशांचा खच; दुषित पाण्याचे प्रवाह नदीत 

विजय लोहार

नेर्ले ( जि. सांगली) : वाळवा तालुक्‍यातील बहे येथील रामलिंग बेटावर कृष्णा नदीपात्रात मळी मिश्रित पाणी व दूषित पाण्यामुळे मृत माशांचा खच पडला आहे. साधारणपणे 25 हजार चौरस फुटांच्या परिसरात ही हानी झाली आहे.

सांडपाणी, गटारीतील व मळी मिश्रित पाणी, ओढे, नाल्यांमार्फत नदीच्या पाण्यात मिसळत आहे. शेतीसह नदीतील जीवसृष्टी धोक्‍यात आली आहे. प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. 

वाळवा तालुक्‍यातील बहे येथे रामलिंग बेट आहे. मोठ्या पुलासह छोटा बंधारा आहे. बंधाऱ्यात छोटे छोटे दरवाजे बसवले गेले आहेत. बंधाऱ्याला लोखंडी दरवाजे आहेत. तांबवेच्या बाजूने नदीत मळी मिश्रित पाणी, सांडपाणी, दगडांची राळ यामुळे पाणी दूषित होऊन माशांचा मृत्यू होत असल्याबाबत मच्छिमार सांगतात. 

पाण्यात सांडपाणी, दुर्गंधीयुक्त पाणी, ओढे व नाळ्यातून नदीत पाणी येते. दूषित पाण्यामुळे नदीतील जीवसृष्टी धोक्‍यात आली आहे. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. बहेतील रामलिंग बेटावर माशांचा खच पडला आहे. विषयुक्त पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचे मच्छिमार व स्थानिक सांगत आहेत. 

शासनाने लक्ष द्यावे. सांडपाण्यामुळे व मळी मिश्रित घाणीमुळे पुन्हा कृष्णा प्रदूषित होत आहे. शासनाने केलेली डोळेझाक भविष्यात शेतकरी व ग्रामस्थांची डोकेदुखी ठरणार आहे. 

संपादन :  युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: आधी शमीने धक्के दिले अन् मग नितीश रेड्डी-क्लासेनने LSG च्या गोलंदाजांना फोडलं; SRH चा १५० धावांचा टप्पा पार

२० वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं हाताची नस कापली, मनगटावर १८ वेळा वार; का उचललं टोकाचं पाऊल

Pune Crime: पुण्यात १७ वर्षीय तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, २१ वर्षीय तरुणानं फोटो व्हायरल करण्याची दिली होती धमकी!

Jawkheda Thombre farm fire: जवखेडा ठोंबरे येथे शेतकऱ्याच्या शेडला भीषण आग; ज्वारी कडबा, भुस व औजारे जळून सुमारे ३ लाखांचे नुकसान

Latur sandalwood smuggling news: लोहा-चाकूर परिसरात भाजीपाल्याच्या कॅरेटमध्ये लपवलेले ३६.७५ लाखांचे चंदन जप्त; तिघांना अटक, ५१.९६ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

SCROLL FOR NEXT