पश्चिम महाराष्ट्र

निपाणीत कडक लॉकडाउन कायम ? उद्या प्रशासनाची बैठक

सकाळ डिजिटल टीम

निपाणी : तालुक्‍यातील ग्रामीण भागातील कडक लॉकडाउनचा (nipani lockdown) कालावधी शुक्रवारी (२८) संपला आहे. तर शहरात उद्या सोमवारी (३१) संपणार आहे. यापुढे ७ जूनपर्यंत तालुक्‍यात कडक लॉकडाउन राहणार की? की राज्य सरकारच्या नियमानुसार (rules of state government) सकाळी ६ ते १० वाजेपर्यंतची सेवा सुरू होणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. त्याबाबत सोमवारी (३१) बैठक आहे.

सेवाही बंद आहेत. शहरात १ जूनपर्यंत तर ग्रामीण भागात आठ दिवसांसाठी लॉकडाउन होता. तहसीलदार व तालुका पंचायत प्रशासनाने ग्रामीण भागात शुक्रवार (२८) पर्यंत कडक लॉकडाउनचे आदेश दिले होते. त्यानुसार ग्रामीण भागात शुक्रवारी लॉकडाउन संपला तरी शनिवारी (२९) पासून राज्य सरकारचा विकेंड लॉकडाउन (weakend lockdown) सुरु झाला. सोमवारी सकाळी ६ वाजता विकेंड लॉकडाउन संपत आहे. सोमवारपर्यंत कडक लॉकडाउन असल्याने उद्या (ता. ३१) व सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत किराणा दुकानांसह अन्य व्यवसाय सुरु करता येणार नाहीत. मात्र ग्रामीण भागात सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत सेवा सुरु राहणार? की नाही? याची प्रतिक्षा खेड्यातील दुकानदार, ग्रामस्थांना लागून आहे.

बुधवारनंतर पुन्हा लॉकडाउन?

शहरात मंगळवारी (१) व बुधवारी (२) सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास मुभा द्यायची व त्यानंतर ७ जूनपर्यंत कडक लॉकडाउनचा विचार प्रशासन करीत आहे. त्याबद्दल सोमवारी (३१) प्रशासनाच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याचे आयुक्त महावीर बोरण्णावर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT