बेळगावात नव्या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक लवकरच

७ जूननंतर प्रवेश प्रक्रियेबाबत निर्णय; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळणार
बेळगावात नव्या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक लवकरच

बेळगाव : कोरोनामुळे शैक्षणिक वर्षाची सुरुवात (delay educational year) होण्यास विलंब होणार असला तरी शिक्षण खात्याने पंधरा दिवसात २०२१ -२२ नवीन शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ७ जूननंतर नवीन प्रवेश प्रक्रिया सुरू (time table declaired) करण्याबाबतही निर्णय घेण्यात येणार आहे. कोरोनामुळे शैक्षणिक वर्षावर मोठा (effects of corona on education) परिणाम झाला आहे. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. मात्र,

शिक्षण खात्याने शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास अधिक विलंब न लावता लवकर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. (belgaum education year) यासाठी विद्यागम किंवा ऑनलाईन या पर्यायांचा विचार केला जाणार आहे. राज्यातील अनेक खासगी शाळांनी १ जूनपासून ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही शिक्षण खात्याच्या सूचनेनंतर सरकारी व अनुदानित शाळा सुरु होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण खात्याच्या निर्णयानंतरच शाळेत दाखल व्हावे लागणार आहे.

बेळगावात नव्या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक लवकरच
अजित पवारांना ना तत्व, ना व्यवहार; चंद्रकांत पाटीलांची टीका

शिक्षण खात्याने राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना स्मार्टफोन देण्याचा विचार सुरू केला आहे. मात्र, सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. कोरोनाचे संकट येत्या दिवसात कसे असेल याबाबतचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षण खात्याची गोची झाली आहे. सलग दुसऱ्यावर्षी वेळेत शैक्षणिक वर्ष सुरु न झाल्यास विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय

गेल्या वर्षभरापासून शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी काही खासगी शाळांनी एक जूनपासून ऑनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, नवा अभ्यासक्रम तयार असल्यामुळे ब्रिज कोर्स विद्यार्थ्यांना शिकविण्याचा प्रयत्न शैक्षणिक संस्थांकडून होणार आहे.

बेळगावात नव्या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक लवकरच
वातावरणात बदल, मॉन्सून ३ जूनला केरळात - IMD

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com