10th
10th 
पश्चिम महाराष्ट्र

दहावी परीक्षेत सोलापूरचा टक्‍का घसरला

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी दुपारी 1 वाजता जाहीर झाला. सोलापूर जिल्ह्याचा एकूण 81.43 टक्के निकाल लागला असून गतवर्षीपेक्षा यंदा दहावीच्या निकालात 9 टक्क्यांची घसरण झाली आहे.  यंदाही दहावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. 

इयत्ता दहावीसाठी सोलापूर जिल्ह्यातून एकूण 64 हजार 594 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 52 हजार 596 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 35 हजार 625 मुलांपैकी27 हजार 82 मुले उत्तीर्ण झाली. मुलांची टक्केवारी 76.02 टक्के आहे. जिल्ह्यातून 28 हजार 969 विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी 25 हजार 514 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी 88.07 टक्के असून मुलांपेक्षा मुलींची टक्केवारी अधिक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या रस्त्यावर थरार, पोलीस गुंडांमध्ये चकमक

SCROLL FOR NEXT