university exams sakal
पश्चिम महाराष्ट्र

पदवी प्रथम वर्षाच्या परीक्षा 29 पासून

एक महिना चालणार : जुनमध्ये पुढील सेमीस्टर

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : राणीच चन्नमा विद्यापीठाअंर्गत येणाऱ्या पदवी महाविद्यालयातील पदवी द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या परीक्षा नुकताच पार पडल्या आहेत. मात्र, आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पदवीच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा २९ एप्रिल ते २९ मे या एक महिनाभराच्या कालावधीत होणार आहेत.

कोरोणामुळे गेल्या दोन वर्षापासून शैक्षणिक वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे वेळापत्रक रुळावर आले असले तरी अद्यापही महाविद्यालयीन वेळापत्रक रुळावर आलेले नाही. दरवर्षी जुलै महिन्यात महाविद्यालय सुरू होतात. मात्र यंदा उशीर होणार आहे. गेल्या आठ दिवसापूर्वी द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या पदवीच्या परीक्षा झाल्या. सध्या त्यांचे मूल्यमापनाचे कामही हाती घेण्यात आले आहे. मात्र, सध्या पदवीच्या पहिल्या वर्षातील परीक्षा सुरू होणार आहेत. एक महिनाभर परीक्षा चालणार आहेत. त्यामुळे २९ मे नंतर मूल्यमापन होणार आहे. या वर्षातील विद्यार्थ्यांचे पुढील सेमिस्टरचे वर्ग १० जूनपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

या परीक्षा उद्यापासून सुरू होणार असल्याने विद्यार्थी अभ्यासात गुंतले आहेत. संबंधित महाविद्यालयातून हॉल तिकीट दिले जात आहेत. राष्ट्रीय शिक्षण नीती यंदा पहिल्यांदाच पदवी अभ्यासक्रमात लागू करण्यात आली आहे. त्यानुसार ही परीक्षा होत आहे. सुरुवातीला राज्यात कन्नड विषय शक्तीचा केल्यामुळे मोठे वादंग उठले. यामध्ये न्यायालयाने हस्तक्षेप केल्यामुळे कन्नड विषय रद्द करण्यात आला. या प्रक्रियेत काही महिने उलटले. त्यामुळे पदवीच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळेवर होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे द्वितीय व तृतीय वर्षांतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. आता पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होतील.

नुकताच पदवीच्या द्वितीय आणि तृतीय वर्षातील परीक्षा पार पडल्या आहेत. २९ एप्रिल पासून पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होतील. २९ मे पर्यंत या परीक्षा चालतील. त्यानंतर त्यांचे वर्ग सुरू होतील.

-राजेंद्र पोवार, आरपीडी महाविद्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT