swine flu
swine flu 
पश्चिम महाराष्ट्र

डेंगी अन्‌ स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढले 

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील नाशिक, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांसह अन्य जिल्ह्यांमध्ये मागील दोन महिन्यांपासून स्वाइन फ्ल्यू, डेंगी व चिकुनगुनिया या आजाराने थैमान घातले आहे. यंदा डेंगी आणि स्वाइन फ्लूमुळे तब्बल 129 जणांचा मृत्यू झाला असून सात हजार 145 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दुसरीकडे शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना खासगी मेडिकलमधून ती खरेदी करावी लागत आहेत. 

मागील वर्षी खरेदी केलेल्या औषधांची बिले शासनस्तरावरून अद्यापही पूर्णपणे मिळालेली नाहीत. त्यामुळे शासकीय रुग्णालयांनी आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील शिल्लक निधीतून औषध खरेदी करायला सुरवात केली आहे. त्याबाबत राज्य सरकारनेही परवानगी दिली आहे. दुसरीकडे राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्‍टर व परिचारिकांची हजारो पदे रिक्‍त आहेत. त्यामुळेही रुग्णांना पुरेशा प्रमाणात सोयी-सुविधा, उपचार देण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

राज्यात चिकुनगुनिया, डेंगी व स्वाइन फ्लू या आजारांच्या पार्श्‍वभूमीवर रुग्णालयांना मागणीनुसार पुरवठा केला जात आहे. सद्यःस्थितीत स्वाइन फ्लू आजारावरील तीन लाख 52 हजार 722 गोळ्या तर लहान मुलांसाठीच्या 10 हजार 340 गोळ्या शिल्लक आहेत. खासगी, शासकीय मेडिकल स्टोअरमध्येही या आजारांवरील औषध विक्री करायला शासनाने परवानगी दिली आहे. 
- डॉ. प्रकाश भोई, सहसंचालक, आरोग्य विभाग 

यंदाची राज्याची सद्यःस्थिती 
(डेंगी) 
5,914 रुग्ण 
मयत झालेले रुग्ण 
18 
स्वाइन फ्लू 
1,231 रुग्ण 
मयत झालेले रुग्ण 
111 
चिकुनगुनिया 
611 रुग्ण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT