devotee like a strike
devotee like a strike 
पश्चिम महाराष्ट्र

बंद अच्छा है, शिर्डीत साईभक्तांच्या भावना   

सतीश वैजापूरकर

शिर्डी :रस्त्यावर फेरीवाले नाहीत. खासगी वाहनांची दाटी नाही. पोलिसदादाही मेहेरबान. ना भाविकांचे वाहन अडविले, ना दंडाची पावती. पादचारी मार्ग पहिल्यांदाच रिकामे. कधी नव्हे ते शिर्डीत मोकळेपणाने फिरता आले. पाकीटमारी, सोनसाखळी चोरही गायब. 50 रुपये किंमतीचे पूजेचा ताट दोन हजार रुपयांना विकल्याचे कानावर आले नाही. लॉकेट घ्या, म्हणून कुणी मागे लागत नव्हते. शिंगणापूर चला, अशी हाळीही कुणाची येत नव्हती. त्यामुळे आजचा "बंद' भाविकांना सुखावून गेला. जणू शिर्डी कायम अशीच बंद राहावी, अशी भावना सोबत घेऊन भाविक आनंदाने घराकडे परतत होते. 

मोकळा श्‍वास... 
एरवी राज्यमार्गावर जड वाहतूक बाहेरून वळविली जाते. मात्र, आरामगाड्या आरामशीर संचार करतात. वळताना वाहतुकीचा नेहमीच खोळंबा करतात. खासगी वाहने चालण्यासाठीही रस्ता ठेवत नाहीत. चौकात दिवसातले 12 तास चक्काजाम. फेरीवाले आणि भिकारी हैराण करतात. पोलिस डोळे बंद करून त्याकडे दुर्लक्ष करतात. भाविकांच्या दक्षिणेतून खरेदी केलेल्या क्रेनने भाविकांचीच वाहने ओढून नेण्यात धन्यता मानतात. कुणाचा मोबाईल चोरीला गेला, तर हरवल्याचा दाखला घेऊन जाण्याचा सल्ला देतात. सोनसाखळी चोरी आणि पाकीटमारीचा फटका परप्रांतीय भाविकांना बसला. बरेच जण पोलिस ठाण्याची पायरीही चढायला तयार नसतात. आज दिवसभर हे नित्याचे दृष्टचक्र बंद होते. 

खिसेकापूंची सुटी 
पोलिसांनी आज खासगी वाहनांसह आरामगाड्यांनादेखील रस्त्यावर येणे नाकारले. भाविकांनी आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली, तरी त्याकडे दुर्लक्ष करून त्यांच्या आनंदात भर घालण्याचे पुण्य कर्म केले. रस्ता मोकळा आणि चोख पोलिस बंदोबस्त, सोनसाखळी चोर आणि पाकीटमारांना "सुटी' घ्यावी लागली. फुल आणि हारांची दुकाने बंद असल्याने येथील लूटमार आपोआप थांबली. शिवीगाळ, दमदाटी, मारहाणीपासून भाविकांची सुटका झाली. 

एजंटांनाही बसला चाप 
गाईड ऊर्फ कमिशन एजंटांनाही चाप बसला. पोलिस आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या कृपेने आजचा "बंद' भाविकांना कधी नव्हे, तो सुखावून गेला. शिर्डी अशीच बंद राहिली, तर साईंची वारी आनंदाची होईल, अशी भावना सोबत घेऊन भाविकांनी परतीचा रस्ता धरला. बंदमुळे साईभक्तांची गैरसोय होईल, अशी शक्‍यता होती. मात्र, तसे काही झाले नाही. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT