या' ग्रामपंचायतींमधील भाऊसाहेबांची "खाबूगिरी' 

this bhausaheb is gulty
this bhausaheb is gulty

नगर : अकोले तालुक्‍यातील ग्रामपंचायतींमधील गैरव्यवहाराच्या पहिल्या टप्प्यातील चौकशीत तीन ग्रामसेवक प्रथमदर्शनी दोषी आढळले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तालुक्‍यातील पाच ग्रामपंचायतींमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत, चौकशीच्या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य सुषमा दराडे यांनी उपोषण केले होते. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. 

दराडे यांचा आरोप 
अकोले तालुक्‍यातील राजूर, केळी, रुम्हणवाडी, शेणीत, तिरडे व आंबेवंगण या ग्रामपंचायतींमध्ये गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांच्या संगनमताने गैरव्यवहार केल्याचा आरोप दराडे यांनी सर्वसाधारण सभेत केला होता. त्यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेसमोर 19 डिसेंबर 2019 रोजी उपोषणही केले होते. 

तिरडे, आंबेवंगण, शेणीतचे ग्रामसेवक दोषी 
या प्रकरणी चौकशीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. पाटील यांनी तीन पथकांची नियुक्ती केली होती. त्यातील एका पथकाचा अहवाल तयार झाला आहे. त्यात तिरडे, आंबेवंगण व शेणीत येथील ग्रामसेवक अनुक्रमे ग्रामसेवक एस. एन. बोरवे, डी. आर. बैरागी व अरुणा गंभिरे प्रथमदर्शनी दोषी आढळले आहेत. त्यामुळे पाटील यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर त्यांच्या निलंबनाचे अध्यादेश अपलोड करण्यात आले आहेत. 

80 पानांचा अहवाल 
दरम्यान, दराडे यांनी पाच ग्रामपंचायतींच्या चौकशीची मागणी केली होती. त्यातील तीन ग्रामपंचायतींची चौकशी पूर्ण झाली असून, उर्वरित दोन ग्रामपंचायती व पंचायत समितीतील लेखा विभागाचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. पहिला चौकशी अहवाल 80 पानांचा असून, तो उपोषणकर्त्या जिल्हा परिषद सदस्य सुषमा दराडे यांना देण्यात आला आहे. 

राजकारण तापण्याची शक्‍यता

या अहवालानंतर जिल्हा परिषदेतील राजकारण तापण्याची शक्‍यता आहे. जिल्हा परिषद सदस्य दराडे यांनी तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांनी आरोप केले होते. अध्यक्ष दुजाभाव करीत असल्याची त्यांची भावना होती. मात्र, हे आरोप विखे यांनी फेटाळून लावले होते. या आरोपांनंतर जिल्हा परिषदेत मोठा गदारोळ झाला होता. या आरोप-प्रत्यारोपांमागे राजकारण असल्याचा जिल्हा परिषदेतील सूत्रांचे म्हणणे आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com