Dhairyasheel Sambhajirao Mane Entry ban in Belgaum Collector Nitesh Patil sakal
पश्चिम महाराष्ट्र

Dhairyasheel Mane : खासदार धैर्यशिल माने यांच्यावर प्रवेशबंदी; डीसींचा आदेश

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष आणि खासदार धैर्यशिल माने यांच्यावर परत एकदा बेळगावात प्रवेशबंदी

महेश काशिद

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष आणि खासदार धैर्यशिल माने यांच्यावर परत एकदा बेळगावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ६ डिसेंबरला महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाईसह खासदार माने यांच्यावर प्रवेश बंदी करण्यात आली होती. त्यानंतर आता परत महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे उद्या (ता.१९) येथे महामेळावा आयोजिला आहे. त्याला उपस्थित राहण्यासाठी श्री माने येणार होते. मात्र, त्यांच्यावर प्रवेश बंदीचे आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज (ता.१८) बजाविले आहेत.

महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सोमवारी (ता.१९) व्हॅक्सीन डेपो येथे महामेळावा आयोजिला आहे. मेळाव्याला कोल्हापूरचे खासदार व महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने उपस्थित राहणार असल्याचे कळविले आहे. कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बेळगावात टिळकवाडीमध्ये व्हॅक्सिन डेपोवर महामेळावा आयोजिला आहे. या महामेळाव्याला महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष माने यांना आमंत्रित केले आहे. त्यानुसार उद्या बेळगावला येण्याबाबत माने यांनी कळविले असून, कर्नाटक सरकारला दौऱ्याची अधिकृत माहिती कळविले आहे. मात्र करनाट सरकारने कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याशी शक्यता असल्याचे कारण देत प्रवेशबंदी जारी केली आहे. सीमाप्रश्नावरून बेळगावात अलीकडे निर्माण झालेल्या परिस्थितीचा दाखला, महाराष्ट्रात कर्नाटक बसेसना फासलेले काळे, दौऱ्यामुळे संभाव्य बेळगावातील भाषिक सौहार्दतेला धोका पोचण्याची भिती व कन्नड-मराठी भाषकांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने खा. माने यांना बेळगावात प्रवेशबंदी जारी केल्याचे जिल्हाधिकारी पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

कर्नाटकातर्फे निर्बंधचा पायंडा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारतर्फे अलिकडे सीमासमन्वय मंत्री म्हणून चंद्रकांतदादा पाटील, शंभूराजे देसाई यांची निवड केली आहे. या मंत्र्यांसह खासदार धैर्यशिल माने ६ डिसेंबर रोजी बेळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार होते. मात्र, दौऱ्याला आक्षेप घेत प्रवेशबंदीचे आदेश बजावले. याची धूळ खाली बसते न बसते तेच येथे होणाऱ्या महामेळाव्याला येणाऱ्या खासदार माने यांची अडवणूक केली जात आहे. प्रवेश बंदी संदर्भात आदेश जारी बजाविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT