पश्चिम महाराष्ट्र

...ही तर माजलेल्या सत्तेची अंत्ययात्रा - धनंजय मुंडे

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या यात्रेचे नावच आठवत नाही. ते विचारतात कोणती यात्रा? आमच्या परिवर्तन यात्रेला लाभलेला जनतेचा प्रतिसाद बघा, ही यात्रा म्हणजे तुमच्या सत्तेच्या माजाची अंत्ययात्रा आहे, असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. मुस्कॉन लॉन येथे झालेल्या परिवर्तन यात्रेतील सभेत ते बोलत होते. 

शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी प्रास्ताविक केले. श्री. मुंडे म्हणाले, की मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेवर टीका केली. त्यांना या यात्रेचे नावच आठवले नाही. पण, मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो, की तुमच्या नाकर्तेपणामुळे आमच्या परिवर्तन यात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.

परिवर्तन यात्रा म्हणजे तुमच्या सत्तेच्या माजाची अंत्ययात्रा आहे. गेल्या निवडणुकीत ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखवून भाजप सत्तेत आले. आता ‘अच्छे दिन’ म्हटले, की लोक हसतात किंवा शिवीगाळ करतात. पेट्रोल, गॅस, धान्य सर्वांनीच उच्चांक गाठला आहे. त्यांचे दर पाहिले की रात्री झोप येत नाही.

- धनंजय मुंडे 

शिवसेनेवर टीका करताना मुंडे म्हणाले, की बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना स्वाभिमानी होती. पण, आता पाच मंत्रिपदासाठी शिवसेनेने भाजपसमोर लाचारी स्वीकारली आहे. राज्यात आणि केंद्रात सत्तेत भागीदार असणारी शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याचे धाडस दाखवत नाही.

‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे व्हिडिओ दाखवून त्यांची आश्‍वासने खोटी असल्याचा आरोप केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एका कार्यक्रमात सरकारची आश्‍वासने ही केवळ निवडणुकीतील जुमलेबाजी असल्याचे मान्य करतात, यावरूनच सरकारला गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे आता भाजप नेत्यांच्या भूलथापांना जनता बळी पडणार नाही, असे पाटील यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी यांची लाट असताना २०१४ मध्ये तुम्ही मला निवडून संसदेत पाठविले. बास्केट ब्रिज, विमानसेवा ही कामे पूर्णत्वास नेण्यासाठी पुन्हा एकदा मला संधी द्यावी.

- धनंजय महाडिक, खासदार

यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, के. पी. पाटील, राजेश लाटकर, आदिल फरास, व्ही. बी. पाटील, रामराजे कुपेकर, देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे, महिला आघाडीप्रमुख वहिदा मुजावर, युवा आघाडीचे अध्यक्ष रोहित पाटील आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या रस्त्यावर थरार, पोलीस गुंडांमध्ये चकमक

SCROLL FOR NEXT