पश्चिम महाराष्ट्र

संपूर्ण धनगर समाज 'या' उमेदवारामागे खंबीरपणे उभा 

सकाळ वृत्तसेवा

म्हसवड, ता. 16 : माजी आमदारांनी धनगर समाजाची मते मिळविण्यासाठी कितीही खटाटोप केला तरी त्यांच्या हाती काहीच लागणार नाही असा टोला मामूशेठ विरकर यांनी जयकुमार गोरे यांना लगावला. तसेच धनगर समाजाचा पाठिंबा प्रभाकर देशमुख यांना विधानसभेत पाठवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माण – खटाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांना जाहीर पाठींबा देण्याची भूमिका माण–खटावमधील धनगर समाजाने घेतली आहे. माण–खटाव मतदारसंघात धनगर समाजाचे जवळपास 80 हजार मतदान आहे. धनगर समाजाची मोठी व्होट बँक प्रभाकर देशमुख यांच्या पाठीमागे उभी राहिल्याने माण–खटावमधील निवडणुकीचे चित्र बदलणार आहे.

म्हसवड येथे आज  झालेल्या धनगर समाजाच्या मेळाव्यामध्ये प्रभाकर देशमुख यांच्यासह अनिल देसाई, दिलीप येळगावकर, मामूशेठ विरकर, बबन विरकर, युवराज बनगर, सतीश मडके, अशोक माने, नानासाहेब डोलताडे, जे.टी पोळ, पृथ्वीराज राजेमाने, बाबासाहेब हुलगे, दादासाहेब शिंगाडे, जालिंदर खरात, बाळासाहेब काळे, दादासाहेब दोरगे, अशोक राजगे, वैशाली विरकर, विक्रम शिंगाडे, सदाशिव बनगर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पराभवाच्या भितीने बिथरलेल्या विरोधकांनी प्रभाकर देशमुख यांच्याविषयी अपप्रचार सुरु केला होता. मराठा विरुद्ध धनगर असा वाद पेटवून आपली पोळी भाजण्यासाठी ते सरसावले होते. मात्र धनगर समाजाने प्रभाकर देशमुख यांना जाहीर पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्यामुळे विरोधकांच्या आरोपातील हवाच निघून गेली आहे अशी भावना धनगर समाजातील नेत्यांनी व्यक्त केली. धनगर समाजाबरोबरच वंजारी, दलित, माळी, रामोशी, कैकाडी अशा अठरापगड जातीच्या नेत्यांनी प्रभाकर देशमुख यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. 

धनगर समाजासाठी काही पण 

प्रभाकर देशमुख यांनी धनगर समाजातील प्रश्न, त्यांच्या मागण्या, धनगर समाजाच्या संस्कृतीचं संवर्धन आणि विकास करण्याबाबत आश्वासन दिलं. यासोबत धनगर समाजाचा विकास व्हावा, त्यांच्या पुढच्या पिढीची प्रगती व्हावी, त्यांची पारंपरिक व्यवसायवृद्धी व्हावी यासाठी आपण लक्ष घालणार असल्याचंही म्हटलंय. 

धनगर नेते प्रभाकर देशमुखांसोबत 

प्रभाकर देशमुख यांना धनगर समाजातील अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला. देविदास मासाळ, सचिन होनमाणे, बाबाराजे हुलगे, मारुती मोठे, विराज गोरड, भास्कर काळे, सुभाष घुटुगडे, अंकुश गारळे, बाळासाहेब मदने, महादेव मासाळ, रामचंद्र झिमल, संजय दिडवाघ, बाबासाहेब माने, बापू बनगर, भारत अनुसे आदी नेत्यांचा समावेश आहे.

धनगर समाजाच्यावतीने काठी आणि घोंगडं देऊन प्रभाकर देशमुख  आणि डाॅ. दिलीप येळगावकर यांचा सत्कार करण्यात आला.

WebTitle : dhangar community is standing behind prabhakar deshmukh for vidhansabha 2019

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT