download.png
download.png 
पश्चिम महाराष्ट्र

मंगळवेढ्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुऴे राष्ट्रवादीत धुसफूस

हुकूम मुलाणी

मंगळवेढा : गेल्या अनेक महिन्यापासून लांबणीवर पडलेल्या शहर व तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जिल्हाध्यक्ष दिपक आबा साळुंके पाटील यांनी जाहीर केल्या पण या निवडीने मंगळवेढ्यातील राष्ट्रवादीत असलेली धुसफूस चव्हाट्यावर आली.

शहर व तालुका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असताना पक्षाला अलिकडच्या काळात घरघर लागली.नगरपालिकेत नेते राहुल शहा यांच्यामुळेे आमदार भालके गटाशी युती करत राष्ट्रवादी सत्तेपर्यत आली. तालुक्याच्या ग्रामीण भागात मात्र राष्ट्रवादीला स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामपंचायतीमध्ये अपेक्षित यश मिळवता आले नसल्यामुळे तालुका राष्ट्रवादीची भाकरी फिरवण्याची गरज असल्याचे ओरड होवू लागली. त्यामध्ये भाकरी फिरवण्यात आली त्यामध्ये शहराध्यक्ष म्हणून पक्षनेते अजित जगताप यांनी संधी दिली. तर तालुकाध्यक्ष म्हणून सुनिल डोके यांना संधी दिली.

याशिवाय लतीफ तांबोळी, भारत बेदरे, भारत पाटील, काशीनाथ पाटील, पी.बी.पाटील, सोमनाथ माळी यांना जिल्हयाच्या बॉडीत संधी देवून उत्तम प्रकारे जातीय समतोल साधला गेल्याचा दावा केला असला तरी राष्ट्रवादीचे नेते राहूल शहा यांना निवडी दरम्यान विश्वासात घेतले नसल्यामुळे प्रांतीक सदस्यांचा राजीनामा देण्याची तयारी ठेवली यामुळे यात असलेली धुसफूस बाहेर आली. तर पक्षनेते अजित जगताप यांनी पत्रकार परिषद घेवून माझ्या निवडीवरून नाराजी असेल तर या क्षणी राजीनामा देण्याची तयारी असल्याचे बोलून दाखवले.

सध्या निवडणुका नसल्या तरी आगामी काळातील लोकसभा व विधानसभा निवडणूकीचा विचार करता राष्ट्रवादीपासून  दुरावलेला मतदार पुन्हा राष्ट्रवादीकडे आर्कषित करण्याचे आव्हान असले तरी निवडीवरून झालेली धुसफूस शांत न झाल्यास याचे पडसाद लोकसभा व विधानसभा निवडणूकीत दिसण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT