District Maratha education institute will provide Rs 50 lakh for Chief Minister's Fund
District Maratha education institute will provide Rs 50 lakh for Chief Minister's Fund 
पश्चिम महाराष्ट्र

जिल्हा मराठाची दर्यादिली, मुख्यमंत्री निधीसाठी देणार ५० लाखांचा निधी

सकाळ वृत्तसेवा

नगर - जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेला समाजसेवेची मोठी परंपरा आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या देणगीतून या संस्थेची निर्मिती झाली आहे. ग्रामीण भागात प्राथमिक तसेच माध्यमिक शाळा आहेत. हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, तसेच इंग्लिश मीडियमच्या शाळाही संस्थेने सुरू केल्या आहेत. या संस्थेच्या लॉ कॉलेजमध्ये शिकलेले विद्यार्थी नामवंत वकील झाले आहेत. काहींची न्यायाधीशपदावर निवड झाली आहे.

या संस्थेने नेहमीच आपल्या पूर्वसूरींचा समाजसेवेचा वारसा चालवला आहे. कोरोना विषाणूमुळे राष्ट्रीय संकट उभे राहिले आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येकजण पुढे सरसावला आहे. त्या पार्श्वभूमीवर  जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थाही पुढे आली आहे. त्यांनी ५० लाख रूपये मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचे ठरवले आहे.

संस्थेतील कर्मचारी, अधिकारी, शिक्षक, विश्वस्त इतर पदाधिकारी मिळून हा निधी जमा करणार आहेत. यापूर्वीही संस्थेने अनेक संकटाच्या काळात मदत केली आहे.

आमच्या संस्थेला समाजसेवेची मोठी परंपरा आहे. छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मृत्यर्थ ही संस्था उभी राहिली आहे. त्यांचाच वारसा आम्ही चालवित आहोत. कोरोनाचे संकट मोठे आहे. सर्वांचे जीव वाचवण्यासाठी सरकार आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. त्यात आमची संस्थाही खारीचा वाटा उचलून ५० लाख रूपयांचा निधी देणार आहे.

- जी.डी. खानदेशे, सचिव, जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था,नगर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा फेक फोटो व्हायरल; स्वतःच सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT