Maharashtra Kesari Chandrahar Patil Prakash Ambedkar esakal
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha Election : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील 'वंचित'कडून लढणार? प्रकाश आंबेडकरांनी पाटलांना दिलं 'हे' आश्वासन

चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांनी सांगली लोकसभा मतदार संघातून शंभर टक्के लढणार आहे, असे जाहीर केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

चंद्रहार पाटील म्हणाले, ‘‘मी लोकसभा लढणारच आहे, प्रमुख पक्षांकडून ऑफर आली तर मी विचार करेन, असे ॲड आंबेडकर यांना मी सांगितले.

सांगली : सांगली लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवू इच्छिणारे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भेट घेतली. पुण्यात एक तास बंद खोलीतील चर्चेनंतर चंद्रहार यांना ‘तयारीत राहा, तुमच्यासारखा उमेदवार चांगली लढत देऊ शकतो. मी तुमच्या पाठीशी राहीन’, अशा शब्दांत आंबेडकरांनी आश्‍वस्त केल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांनी सांगली लोकसभा मतदार संघातून शंभर टक्के लढणार आहे, असे जाहीर केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आंबेडकरांनी आज चर्चेसाठी त्यांना बोलावले होते. दुपारी पुण्यात बैठक झाली. त्यात चंद्रहार पाटील यांची निवडणूक लढण्यामागची भूमिका काय, तयारी काय, मुद्दे काय, याबाबत ॲड. आंबेडकर यांनी जाणून घेतले.

सांगली मतदार संघातून गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला तीन लाख मते मिळाली होती. तेथे आमचा मतदार आहे. आघाडीची गणिते जमून आली तर यावेळी सांगलीचा खासदार ‘वंचित’चा असेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

चंद्रहार पाटील म्हणाले, ‘‘मी लोकसभा लढणारच आहे, प्रमुख पक्षांकडून ऑफर आली तर मी विचार करेन, असे ॲड आंबेडकर यांना मी सांगितले. त्यावर त्यांनी वंचित बहुजन आघाडीची सध्या महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरू आहे. मी सांगलीची जागा प्राधान्याने मागणार आहे. तसा निर्णय झाला तर नक्कीच विचार होईल. तुम्ही चांगले उमेदवार ठराल. तयारीत राहा. मी पाठीशी आहे, अशा शब्दांत पाठिंबा दिला.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT