पश्चिम महाराष्ट्र

राजकीय द्वेषातून पलूस, कडेगावला दुष्काळी यादीतून डावलले - डॉ. विश्‍वजित कदम

सकाळवृत्तसेवा

कडेगाव - पलूस-कडेगाव हा काँग्रेसचा मतदारसंघ असल्याने भारतीय जनता पक्ष सरकारने राजकीय द्वेषातून या दोन्ही तालुक्‍यांना दुष्काळी यादीतून जाणीवपूर्वक डावलले. तेव्हा सरकार कुणाचे का असेना, येथील सर्व लोक माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे येथील सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन, मोर्चे काढून, तसेच येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात याबाबत जोरदार आवाज उठविणार असून, पलूस-कडेगाव तालुक्‍यांत दुष्काळ जाहीर झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. भाजपचे सरकार फसवे असून, केवळ घोषणाबाजी करणारे आहे, अशी टीका आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनी केली.

पलूस-कडेगाव तालुक्‍यांचा दुष्काळी यादीत समावेश व्हावा, या मागणीसाठी आमदार डॉ. विश्‍वजित कदम व आमदार मोहनराव कदम यांच्या नेतृत्वाखाली आज येथील प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी डॉ. कदम बोलत होते.

पलूस-कडेगाव तालुक्‍यातील कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील जिल्हा परिषद शाळेसमोरील मैदानातून निघालेल्या मोर्चाचे प्रांताधिकारी कार्यालयासमोर सभेत रूपांतर झाले.

डॉ. कदम म्हणाले, की पतंगराव कदम मंत्री असताना पंधरा वर्षांच्या काळात अतिवृष्टी झाली वा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली की लगेच उपाययोजना करायचे. सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही दिवसांपूर्वी पलूस-कडेगाव तालुक्‍यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्यासाठी मोर्चा काढणार, असे पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यानंतर मुख्यमंत्री, महसूलमंत्री, पालकमंत्री यांच्याशी दोन्ही तालुक्‍यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्यासाठी सकारात्मक चर्चा केली. त्यानंतर विरोधकांनी जागे होत महसूलमंत्र्यांना दुष्काळाबाबत भेटल्याचा दावा केला आहे. मोर्चाच्या धास्तीने तालुक्‍यातील नेवरी व पलूस तालुक्‍यातील भिलवडी हे दोन सर्कल दुष्काळी यादीत समाविष्ट केल्याचे शासनाने परिपत्रक काढले आहे. परंतु, आम्ही संपूर्ण पलूस व कडेगाव या दोन्ही तालुक्‍यांचा दुष्काळी यादीत समावेश होत नाही, तोपर्यंत संघर्ष करणार आहोत.

या वेळी भीमराव मोहिते, महेंद्र लाड, आनंदराव मोहिते, मालन मोहिते, बाळकृष्ण यादव, ए. डी. पाटील आदींची भाषणे झाली. दीपक भोसले, शांताराम कदम, डॉ. पृथ्वीराज चव्हाण, सुरेश निर्मळ, विजय शिंदे, उपनगराध्यक्ष साजीद पाटील, नगसेवक सागर सूर्यवंशी, सुनील पवार, सुरेश मोहिते, जयसिंगराव कदम, हणमंतराव पवार, महेश कदम, भारत सूर्यवंशी, मधुनाना भोसले, सत्यजित यादव, शोभा होनमाने आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT