सातारा - ‘सकाळ एनआयई’च्या वतीने शाहू कलामंदिरात झालेल्या शालेय नाट्य स्पर्धेतील विजेते गुरुकुल स्कूलचे विद्यार्थी नाटक सादर करताना.
सातारा - ‘सकाळ एनआयई’च्या वतीने शाहू कलामंदिरात झालेल्या शालेय नाट्य स्पर्धेतील विजेते गुरुकुल स्कूलचे विद्यार्थी नाटक सादर करताना. 
पश्चिम महाराष्ट्र

नाट्य स्पर्धेत ‘गुरुकुल’ची ‘क्रांतिज्योत’ प्रथम

सकाळवृत्तसेवा

सातारा - शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ एनआयई’च्या वतीने झालेल्या ‘सकाळ एनआयई’ नाट्य स्पर्धेत साताऱ्याच्या गुरुकुल स्कूलने (एकांकिका-क्रांतिज्योत) सांघिक प्रथम क्रमांक मिळविला. येथील न्यू इंग्लिश स्कूलने दुसरा (निबंध), तर एमआयडीसीतील लोकमंगल हायस्कूलने (हम पंछी एक डाल के) तिसरा क्रमांक पटकावला.

स्पर्धेत सांघिक उत्तेजनार्थ पहिला क्रमांक शिरवळच्या सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूलने (संडास तर बांधले याचं काय), तर दुसरा क्रमांक प्रोग्रेसिव्ह कान्व्हेंट स्कूलने (शहीद भगतसिंग) मिळवला. 

विद्यार्थी गटात अभियनामध्ये पहिला क्रमांक नीलेश कोल्हटकर (न्यू इंग्लिश स्कूल, सातारा), दुसरा क्रमांक यश गुरव (लोकमंगल), तर तिसरा क्रमांक रयत इंग्लिश मीडियम स्कूलच्या झुल्फीकार शेख याने मिळविला. अभिनय उत्तेजनार्थ पहिली दोन बक्षिसे अनुक्रमे समर्थ काशीद (प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल, फलटण), प्रसन्नजित पवार (साखरवाडी) यांनी मिळविले. 
विद्यार्थिनी गटात अभिनयात पहिला क्रमांक गुरुकुल स्कूलच्या वेदिका सुर्वे, तर दुसरा क्रमांक न्यू इंग्लिश स्कूलच्या साक्षी पलंगे आणि तिसरा क्रमांक शिरवळच्या सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूलच्या नक्षत्रा राऊत हिने मिळविला. यामध्ये उत्तजनार्थ बक्षिसे अनुक्रमे निरुती भोसले (सातारा इंग्लिश मिडियम स्कूल, सातारा) आणि सानिका ढमारे (साखरवाडी विद्यालय, साखरवाडी) यांनी मिळविले. 

बक्षिसे जाहीर होताच विद्यार्थी कलाकार व त्यांच्या सहकाऱ्यांनी जल्लोष केला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेचे प्रायोजक सक्‍सेस ॲबॅकस, सिटी सेंटर, कणसे ह्युंदाई, हॉटेल रजताद्री, चकोर बेकरी हे होते. स्पर्धेत जिल्ह्यातील ११ शाळा सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेच्या निमित्ताने जिल्ह्यातील बाल कलाकारांना आपल्यातील कलागुण दाखविण्याची संधी मिळाली. विविध शाळांच्या बाल कलाकारांनी कसलेल्या कलाकारांसारखा अभिनय करत रसिकांची मने जिंकली. साताऱ्यातील अभिनेते बाळकृष्ण शिंदे, मकरंद गोसावी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

यावेळी अभिनेते रवींद्र डांगे, सक्‍सेस ॲबॅकसचे किरण पाटील यांच्या हस्ते तसेच परीक्षक आणि ‘सकाळ’चे शाखा व्यवस्थापक राजेश निंबाळकर यांच्या हस्ते विजेत्याना बक्षिसे देण्यात आली. यावेळी ‘सकाळ’चे सहयोगी संपादक राजेश सोळसकर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ‘सकाळ एनआयई’चे समन्वयक विजय सुतार, ‘यिन’ चे समन्वयक अभिजित बर्गे, मधुरांगणच्या सहायक व्यवस्थापक चित्रा भिसे यांनी परिश्रम घेतले.
स्पर्धेतील इतर विजेते (अनुक्रमे पहिले तीन)

उत्कृष्ट दिग्दर्शन - मिलिंद सुर्वे (गुरुकुल, सातारा), जगदीश पवार (न्यू इंग्लिश स्कूल, सातारा), अभिजित वाईकर (लोकमंगल हायस्कूल, एमआयडीसी).

उत्कृष्ट संगीत - न्यू इंग्लिश स्कूल, सातारा,  लोकमंगल हायस्कूल (एमआयडीसी, सातारा), गुरुकुल स्कूल, सातारा.

प्रकाश योजना - सुनील स्वामी (लोकमंगल हायस्कूल, एमआयडीसी, सातारा), अभिषेक परदेशी (गुरुकुल), जगदीश पवार (न्यू इंग्लिश स्कूल).

नेपथ्य - गुरुकुल स्कूल, सातारा, सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडियम स्कूल, शिरवळ, लोकमंगल हायस्कूल (एमआयडीसी, सातारा).

रंगभूषा वेशभूषा - प्रशांत इंगवले (गुरुकुल), अभिजित वाईकर (लोकमंगल), प्रशांत रासकर (साखरवाडी विद्यालय, साखरवाडी, ता. फलटण).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT