drought like situaion in solapur district
drought like situaion in solapur district  
पश्चिम महाराष्ट्र

गणरायाही आले कोरडेच; सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद

संतोष सिरसट

सोलापूर : पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यात 11 पैकी 10 तालुक्‍यांमध्ये 45 टक्‍यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात साधारणपणे रक्षा बंधनानंतर पाऊस येतो असे सांगितले जात होते. मात्र आज विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन झाले. पण, तोही पाऊस न आणता कोरडाच आला आहे. त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद झाली आहे. 

सोलापूर जिल्ह्याची ओळख ही दुष्काळी जिल्हा अशी आहे. मात्र, मागील वर्षी सुरवातीलाच चांगला पाऊस झाल्याने त्याची जाणीव झाली नाही. त्यातच मागील दोन-तीन वर्षात जलयुक्त शिवारची कामे चांगली झाल्यामुळे पाणीटंचाई जाणवली नाही. एकेकाळी 663 टॅंकर संख्या असलेल्या जिल्ह्यात या तीन वर्षात बोटावर मोजण्याइतकेच टॅंकरही लागले.

मात्र, यंदाच्या वर्षी पाऊसच नसल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे. रब्बीचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याकडे पाहिले जाते. पण, यंदा पाऊसच नसल्याने रब्बी हंगामही वायाच जाणार अशी स्थिती आहे. रक्षाबंधनानंतर पाऊस सुरू होतो असे बोलले जाते. त्यावेळी तो न आल्यास पोळ्यापासून सुरू होईल, असे जाणकार सांगत होते. पण आता हे दोन्ही सण होऊन गेले आहेत. पण पाऊस काही आला नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सगळी आशा विघ्नहर्त्या गणेशाकडे लागली होती. पण, तोही यंदाच्या वर्षी कोरडाच आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यात आजअखेर जेमतेम सरासरी 41.96 टक्केच पाऊस झाला आहे. 

जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण जरी भरले असले तरी या धरणाचा फायदा माळशिरस, पंढरपूर, माढा, मोहोळ या तालुक्‍यांनाच प्रामुख्याने होतो. उर्वरित तालुक्‍यांच्या काही भागात उजनीचे पाणी येते. मात्र, या तालुक्‍यातील बऱ्याच भागात उजनीचे पाणी येत नसल्याने तेथील पिके जळून गेली आहे. आता परतीचा पाऊस तरी कधी येणार असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. मागील 15 दिवसांपूर्वी काही ठिकाणी कृत्रीम पावसाचाही प्रयोग झाला. पण तो फारसा यशस्वी झाला नाही. 

पावसाची तालुकानिहाय सरासरी टक्केवारी -
उत्तर सोलापूर-43.83, दक्षिण सोलापूर-42.75, बार्शी-68.31, अक्कलकोट-39.48, मोहोळ-44.84, माढा-34, करमाळा-27.58, पंढरपूर-41.63, सांगोला-35.67, माळशिरस-42.75, मंगळवेढा-40.57, एकूण-41.96

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT