पश्चिम महाराष्ट्र

अवकाळी पाऊस आला अन् घरावरील पत्रे उडाले; वाऱ्याने पिकांसह आंब्याचेही नुकसान झाले

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड ः सकाळपासून जाणवणाऱ्या उष्म्यानंतर आज (साेमवार) दुपारनंतर जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह खटाव तालुक्‍यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. सुरुवातीला गारांचा वर्षाव पाहिल्यानंतर सातारकरांनी घरात बसूनच जोरदार वाऱ्याचाही अनुभव घेतला. कऱ्हाड- पाटणलाही या पावसाने तडाखा दिला. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने शेती पिकांचे आणि आंब्याचे काही प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाटण तालुक्‍यातील मोरगिरी परिसरात घरांवरील पत्रे उडून नुकसान झाले.
 
कऱ्हाड तालुक्‍यातील विविध भागांत आज दुपारी वादळी पाऊस झाला. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना मशागतीची कामे उरकायची आहेत त्यांना हा पाऊस दिलासादायक ठरला. मात्र, पालेभाज्या आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला. काढणीस आलेल्या टोमॅटो, काकडी, कलिंगडासह आंब्याला याचा फटका बसला. 

मोरगिरी : पाटण तालुक्‍यातील मोरणा विभागात झालेल्या वळीव पावसाने मोरणा विभागाला झोडपले. विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसादरम्यान काही ठिकाणी गारांचाही वर्षाव झाला. आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. वळीव पावसाने मोरणा विभागाला चांगलेच झोडपले. अचानकपणे आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली. वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय झाली. 

शिरवडे : शिरवडे, नडशी, उत्तर कोपर्डे परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह सुमारे अर्धा तास पाऊस झाला. जोरदार वाऱ्यामुळे व विजेच्या कडकडाटात वीजपुरवठा खंडित झाल्याने सर्वांची तगमग झाली. 

मसूर ः मसूर विभागातील हेळगाव, पाडळी, किवळ, चिखली, निगडी, रिसवड, अंतवडी या गावांना पावसाने तडाखा दिला. शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यासह रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी पिकांचेही नुकसान झाले. परिसरात चार दिवसांत उष्णता वाढली होती. दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार झाले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास विजांचा कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. अर्धा तास पाऊस पडला. वांगी, टोमॅटो, भेंडी, गवार आदी भाजीपाल्यासह पिकाचे नुकसान झाले. विभागात सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा काढणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. अचानक झालेल्या या पावसाने पिकांचेही नुकसान झाले आहे. 

तारळे : तीन दिवस वाढलेल्या उष्म्याने आज दुपारी साडेतीनच्या सुमारास जोरदार पावसाने झोडपून काढले. विभागात सर्वदूर पाऊस झाला. काही प्रमाणात शाळू व गहू काढणी राहिलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तर काही शेतकऱ्यांच्या कडबा भिजून नुकसान झाले. विजांचा मोठ्या प्रमाणात कडकडाट सुरू होता. त्यामुळे वीजपुरवठा खंडित केला होता. अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची मात्र तारांबळ उडाली. 


लॉकडाउनचा काळ... आपल्या महाराष्ट्रात गुटखा विक्रीला बंदी... तरीही दुप्पट दरात मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray On Gyanesh Kumar : ‘ज्ञानेशाकडून सत्तेतले रेडे आपले वेद वदवतायत’; राज ठाकरेंचा ज्ञानेश कुमारांवर पुन्हा निशाणा

Pune Ganpati Visarjan Live Tracking: गणपती विसर्जन मिरवणूक Live; कोणतं मंडळ कुठे पोहोचलं? एका क्लिकवर पाहा लाईव्ह लोकेशन अन् ट्रॅफिक अपडेट्स

Gold Rate Today: अनंत चतुर्दशीला सोनं 11 हजारांनी स्वस्त; मुंबई-कोल्हापूरसह महाराष्ट्रभरात ताजा भाव पाहा

Maharashtra Ganesh Visarjan Live: पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात Live पाहा, ढोलताशांच्या गजरात भक्तांचा उत्साह शिगेला

Ray-Ban Glasses: मार्क झुकरबर्गने लाँच केले कॅमेरा नसलेले नवे स्मार्ट ग्लासेस; Muse AI एजंटसह 'म्युझ चार्म' डिव्हाइस बाजारात...

SCROLL FOR NEXT