दुप्पट दर तरीही गुटखाविक्री "लॉकडाउन'मध्येही जोमात

दुप्पट दर तरीही गुटखाविक्री "लॉकडाउन'मध्येही जोमात

सायगाव (जि.सातारा)  : लॉकडाउनच्या काळात आत्यवश्‍यक सेवा सर्वसामान्य जनतेसाठी दिल्या जात असताना जमावबंदी आणि संचारबंदीच्या काळामध्ये महामार्गावरील गावांत खुलेआमपणे गुटखाविक्री सुरू आहे. विशेष म्हणजे व्यापारी वर्ग या दुकानदारांना दुकानापर्यंत माल पोच करीत आहेत. मात्र, पोलिसांचा कडक बंदोबस्त असूनही गुटखा वाहतूक खुलेआमपणे सुरू असल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या "लॉकडाउन'मुळे 23 मार्चपासून दारू धंदे, हॉटेल व्यवसाय, मटण- चिकन विक्री बंद असताना छुप्या मार्गाने हे सर्व धंदे सुरू आहेत. पोलिसांची नाकाबंदी कडक असताना व त्यांचे सर्व लक्ष कोरोनाकडे असल्यामुळे अशा प्रकारचे अवैध धंदे वाढू लागले आहेत. त्यामध्ये पोलिस बळ कमी पडत असल्याकारणाने गुटखा व्यापारी दुचाकीवरून मालाची देवाण-घेवाण करत आहेत. महाराष्ट्रात आधीच गुटखाबंदी असतानादेखील गुटखाविक्री होत होती. परंतु, आता लॉकडाउनच्या काळात तर ही गुटखाविक्री वाढली आहे. आनेवाडी टोल नाक्‍यावर दोन्ही बाजूला पोलिसांचा पहारा असल्याने टोल नाक्‍याच्या पुढे गुटखा घेऊन जाता येत नाही. त्यामुळे शेजारी असणाऱ्या गावांतील पर्यायी मार्गाचा वापर करून वाई तालुक्‍यातील पाचवड, भुईंजसह अन्य गावांपर्यंत गुटखा विकला जात आहे. तसेच साताऱ्यापासून जवळ असलेल्या सातारा आणि जावळी तालुक्‍यातील काही गावांत तसेच आतमधील गावांमध्ये दिवसाढवळ्या गुटखाविक्री होत आहे. त्यातच मुंबई- पुण्यावरून आलेल्या लोकांची त्यात आणखी भर पडल्याने गुटखा व्यवसाय बंदीच्या काळातही जोरदार सुरू आहे. 


 

किरकोळ व होलसेल दर दुप्पट 

"लॉकडाउन'च्या आधी मिळणारा "आरएमडी' गुटख्याचा पुडा 950 वरून आता 1400 पर्यंत त्याची किंमत झाली असून, विमल कंपनीचा 150 रुपयांचा पुडा 300 तर 220 चा मोठा पुडा आता 400 रुपयापर्यंत गेला आहे. गुटखा दर जरी मोठ्या प्रमाणामध्ये वाढले असले तरी खाणाऱ्यांची संख्या काही कमी झाली नाही. त्यामुळे 20 रुपये किमतीची "आरएमडी' पुडी 40 रुपयाला विकली जाते. दहा रुपयाचा विमल 15 रुपये, 15 रुपये विक्रीचा 20 रुपयांपर्यंत दर वाढला तरी गुटख्याची लागलेली सवय काही कमी होताना दिसत नाही.

 सलून व्यावसायिक आणि त्यांच्या ग्राहकांसाठी महत्वपुर्ण बातमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com