Edible oil prices sakal
पश्चिम महाराष्ट्र

Edible oil price : खाद्य तेलाचे भाव उसळले,जीएसटी वाढवल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री

Edible oil price : केंद्र सरकारच्या जीएसटी वाढीमुळे खाद्य तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गणेशोत्सवाच्या आधीच्या आणि नंतरच्या किमतीत २० ते ३० रुपयांचा फरक आहे.

सकाळ वृत्तसेवा

सांगली : केंद्र सरकारने जीएसटी वाढवल्याने खाद्य तेलाचे भाव उसळले आहेत. गणेशोत्सवाच्या पूर्वीच्या आणि नंतरच्या किमतीमध्ये किलोमागे २० ते ३० रुपयांचा फरक पडला आहे. दिवाळीपर्यंत सणांची रीघ असल्याने खाद्यतेलासह डाळींच्या किमती ग्राहकांची चिंता वाढवणाऱ्या आहेत.

खाद्यतेलाचे भाव गणेशोत्सवापूर्वी १६०० रुपयांना मिळणारा १५ किलोचा डबा २००० रुपयांवर पोहोचला आहे. ३०० ते ४०० रुपयांची वाढ डब्यामागे झाली आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी असे एकामागोमाग एक मोठे सण येत आहेत. त्यातच झालेली वाढ ही गृहिणींचे बजेट कोलमडणारी आहे.

गेल्या महिन्यात खोबरे ९० रुपये होते, ते गणेशोत्सवानंतर २०० पार गेले आहे. हरबरा डाळीच्या दरामध्ये १५ ते २० रुपये वाढ झाली आहे. १५ दिवसांत गव्हाच्या किमतीत दोन ते तीन रुपयांची वाढ झाल्याने रवा, मैदा याच्या किमतीदेखील वाढल्या आहेत.

बाजारात आवक घटली

खाद्यतेलाच्या कच्च्या मालावर जीएसटी वाढल्याने खाद्यतेलाच्या किमती वाढल्या आहेत. केरळमधील पुराचा फटका बसल्याने खोबरे महागले आहे.चढ्या भावाने वस्तू खरेदी करण्यास व्यापारी तयार नसल्याने खाद्यतेलाची आवक घटली आहे. त्यामुळे बाजारातील उपलब्धता मर्यादित आहे, असे व्यापारी राजेंद्र निंबाळकर यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT