umang
umang 
पश्चिम महाराष्ट्र

उमंग 2018 महिला महोत्सवाच्या माध्यमातून राजकिय आस्तित्वाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न ?

हुकूम मुलाणी

मंगळवेढा - गेल्या चार वर्षापासून राजकारणापासून दुर असलेल्या माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांची कन्या कोमल साळुंखे-ढोबळे व सावली फौऊडेशनच्या माध्यमातून उमंग 2018 महिला महोत्सव भरविण्यात आला. राजकीय नेत्यांना टाळून ग्रामीण महिलांना ऐन दुष्काळात एकत्र आणण्याचे काम या महोत्सवात झाले. परंतु, यामुळे राजकिय आस्तित्वाचा अंदाज घेण्याचा हा प्रयत्न अशी चर्चा तालुक्यात सुरु झाली आहे. 

मंगळवेढयात पंचवीस वर्षे राजकीय प्रतिनिधीत्व केलेले लक्ष्मण ढोबळे राखीव मोहोळचे प्रतिनिधित्व करतानाही ते मंगळवेढयाचेच लोकप्रतिनिधी असल्यासारखे होते. पण आपल्या पश्‍चात राजकीय वारसदार तयार करण्यात ते कमी पडल्याने त्यांच्या समर्थकांनी 2009 पासून भालके, परिचारक व आवताडे गटाचा आसरा घेतला. त्यानंतर ढोबळे समर्थकानी दिलेल्या ताकदीमुळे अनेकांना सत्ता मिळविणे शक्य झाले असले तरी त्यांच्या पश्‍चात गट मात्र संपुष्टात आला. 2014 च्या विधानसभेच्या पराभवानंतर शरद निष्ठ असलेले ढोबळे राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या मोठया चर्चा झाल्या पण अदयापही अजून कोणत्याच पक्षात प्रवेश केला नसला तरी भविष्यात लोकसभा की विधानसभा यावर तालुक्यातील समर्थकामधून चर्चा सुरु झाल्या. ढोबळे यांनी पुत्र अभिजितला चपळगाव मधून जिल्हा परिषद सदस्य केले. पण याचा लाभ अभिजितला राजकीय भवितव्य करण्यासाठी करता आला नाही. ढोबळेंनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेकांना ताकद दिली तरी त्रास देणाय्राला सरळही केले. हुलजंती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपली राजकीय मोट पुनश्‍च बसविण्याचा प्रयत्न केला. पण त्यात अपयशी ठरले. तरी कन्या कोमल व क्रांती हिने दुष्काळात माहेरातील महिला आधार देण्यासाठी उमंग 2018 महोत्सवाचे आयोजन केले. ग्रामीण महिलांना यामध्ये पाच हजार महिला सभासद होण्याचे नियोजन केले. तब्बल 12 हजार महिलांनी सभासद होत या महोत्सवात हजेरी लावली. यामुळे संयोजकांनी धांदल उडाली. मंगळवेढयात या देखाण्या सोहळयातून दुष्काळी महिला भविष्यात स्वताच्या पायावर उभे राहण्यासाठी शेळी वाटप, जीवनाश्यक वस्तूची मदत करण्यात येणार आहे, शिवाय बचतीसाठी पोस्टात खाते काढून देवून त्यावर दोन लाखाचे विमा सरंक्षण देण्याना पोस्टाच्या विविध योजनेचा लाभ देता येणार  आहे. 

त्यामुळे हा महोत्सव ढोबळे गटाला संजीवनी देणारा ठरला आहे. स्वत ढोबळे कविसमेंलन, माहेर मेळावा, बहुजन रयत परिषद, विदयार्थ्यीन् विकास शिबीर या माध्यमातून लोकांशी संपर्कात होते हे बंद पडलेले उपक्रम त्यांच्या मुलीनीच माहेरात सुरु केल्यामुळे माहेरवाशीण महिला सुखावल्या आहेत. पण या महोत्सवात ढोबळे पुन्हा राजकीय गटबांधणी करणार काय यावर तालुक्यात चर्चेने वेग घेतला आहे. पंढरपूर मतदारसंघात वाढलेल्या इच्छुकांची संख्या आणि लोकसभेसाठीची दावेदारी यात कुठे आपला डाव टाकतात हे लवकरच स्पप्ट होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT