सातारा - उदयनराजेंनी निर्णायक आघाडी घेतल्यानंतर त्यांचे येथील निवासस्थान जलमंदिर पॅलेस परिसरात सायंकाळी युवक व कार्यकर्त्यांनी  गर्दी करून जल्लोष सुरू केला.
सातारा - उदयनराजेंनी निर्णायक आघाडी घेतल्यानंतर त्यांचे येथील निवासस्थान जलमंदिर पॅलेस परिसरात सायंकाळी युवक व कार्यकर्त्यांनी गर्दी करून जल्लोष सुरू केला. 
पश्चिम महाराष्ट्र

Election Results : रनरेट वाढत गेला... अन कॉलर टाइट!

सकाळवृत्तसेवा

सातारा - महिनाभरापासून सुरू असलेल्या आकडेमोडीला आज ‘ब्रेक’ लागत गेला. सातारा लोकसभा मतदारसंघातील खासदार उदयनराजे भोसले, नरेंद्र पाटील यांच्यातील चुरशीच्या लढतीच्या निकालाकडे ताणलेली उत्सुकता सकाळी आठ वाजल्यापासून सुटकेचा श्‍वास घेऊ लागली. पहिल्या फेरीपासूनच उदयनराजेंच्या मतांचा फेरीनिहाय ‘रनरेट’ वाढत जाऊ लागल्याने उमेदवारांसह आघाडीचे नेते, कार्यकर्ते, उदयनराजेप्रेमींच्या ‘कॉलर टाइट’ होत गेल्या.

लोकसभा निवडणुकीचे रणशिंग मार्चमध्ये फुंकले गेल्यानंतर राजकीय वातावरण प्रचंड तापले होते. सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून खासदार उदयनराजे भोसले, शिवसेना-भाजप युतीकडून नरेंद्र पाटील यांच्यासह नऊ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत या दोघांमध्ये सामना रंगला. २३ एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर विजय, मताधिक्‍य तसेच उदयनराजेंना लाखभराचे मताधिक्‍य मिळेल, ते उदयनराजेंना धक्‍का बसेल येथपर्यंत वेगवेगळ्या चर्चा सुरू होत होत्या. त्यामुळे आजच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. 

आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होणार असल्याने जिल्हावासीयांबरोबर राज्यभरातील राजकीय क्षेत्राशी निगडित, उदयनराजेप्रेमींमध्ये उत्सुकता ताणली गेली होती. येथील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणीस प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच उदयनराजेंनी आघाडी घेतली. त्यानंतर फेरीनिहाय ही आघाडी एक ते दीड हजार मतांनी वाढतच गेली. 

मात्र, आज तापमानाचा पारा तब्बल ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोचला असल्याने त्याचा तडाखा कार्यकर्त्यांना बसल्याचे दिसून आले. मतमोजणी केंद्राच्या बाहेर सकाळपासून सायंकाळी चारपर्यंत शुकशुकाट होता.

पोलिसांव्यतिरिक्त कोणीही उन्हात तळपायला कार्यकर्तेही फिरकले नाहीत. दोघांमध्ये टस्सल सुरू असल्याने मोठी गर्दी होण्याची शक्‍यता गृहित धरून प्रशासनाने मतमोजणी केंद्राच्या परिसरात मोठा फौजफाटा उभा केला होता. तपासणी कक्ष उभारला होता. तसेच उमेदवार प्रतिनिधींचे मोबाईल जमा करण्यासाठीही कक्ष उभारला होता. मात्र, रखरखत्या उन्हात बाहेर न पडता कार्यकर्त्यांनी सोशल मीडिया, इलेक्‍ट्रॉनिक मीडियावरच माहिती जाणून घेण्यात धन्यता मानली. 

दुपारी १२ च्या सुमारास उदयनराजेंनी तब्बल ३५ हजार मतांची आघाडी घेतल्याने उदयनराजेंचा विजय निश्‍चित मानला जावू लागला. त्यानंतर फेरीनिहाय मताधिक्‍य वाढू लागल्याने कार्यकर्त्यांत भरउन्हात उत्साह संचारू लागला आणि साताऱ्यातील चौकाचौकांत उदयनराजे यांचे फ्लेक्‍स झळकू लागले. सायंकाळपर्यंत सातारा शहरासह जिल्ह्यातील विविध मोक्‍याच्या ठिकाणी उदयनराजेंच्या विजयाचे फलक लावले जात होते. तसेच जलमंदिर परिसरात कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली. तसेच मतमोजणी केंद्राकडे सायंकाळी कार्यकर्त्यांच्या दुचाकी धावू लागल्या.

साताऱ्याचा बाजारही ओस...
साताऱ्याचा आज आठवडे बाजार होता. परळी, चाळकेवाडी, बामणोली आणि परिसरातील नागरिक या बाजारास येतात. त्यामुळे मोती चौक, राजवाडा परिसर, कर्मवीर भाऊराव पाटील पथ, तांदूळआळी आणि मंडई परिसरात मोठी गर्दी असते. मात्र, आज ग्रामीण भागातील नागरिकांनीही साताऱ्याला येणे टाळले होते. बाजारात, रस्त्यावर गर्दी दिसत नव्हती.

मतमोजणी कशी?
या निवडणूक निकालाची उत्सुकता समाजाच्या सर्व घटकांत होती. अनेकांनी सोशल मीडियावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडून अपडेट मिळविले. मतमोजणी नेमकी कोणत्या मतदारसंघातील सुरू आहे, की एकत्रित मोजणी केली जात आहे, अजून किती फेऱ्या शिल्लक आहेत, किती वाजेपर्यंत निकाल लागेल, यासह अनेक प्रश्‍नांची उत्सुकता लोकांमध्ये होती. स्वत:चा व्यवसाय सांभाळत अनेकांनी विविध चॅनेलवरील नजराही हटविल्या नव्हत्या. रिक्षा थांब्यावर रिक्षाचालक तर ग्राहक येईपर्यंत मोकळ्या रिक्षात मोबाईलवर निकालांचा अंदाज घेत होते. 

... आणि गाठली त्यांनी सावली!
सकाळी आठ वाजता वखार महामंडळाच्या वखारीत मतमोजणीस प्रारंभ होणार असल्याने पोलिस बंदोबस्त कडेकोट ठेवला होता. पहाटे ४.३० वाजल्यापासून पोलिस तेथे तैनात होते. मात्र, मतमोजणी केंद्रावर उमेदवार प्रतिनिधी, मतमोजणी अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार वगळता फारसे कार्यकर्ते नव्हते. दुपारी तीन, चारपर्यंत हे चित्र होते. यामुळे पोलिसांवर कोणताही ताण नव्हता. उन्हाच्या कडाक्‍यातून शांतता मिळण्यासाठी पोलिसांनी झाडांची सावली गाठली. 

...हे चित्र दिसलेच नाही
मतमोजणी केंद्राबाहेर होणारी कार्यकर्त्यांची गर्दी, गुलालाची दुकाने, कार्यकर्त्यांचा जल्लोष हे निकालादिवशी वर्षांनुवर्षे पाहण्यास मिळणारे चित्र आज दुपारपर्यंत कोठेही दिसले नाही. कडक उन्हामुळे कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोबाईल आणि दूरदर्शन संचाकडे डोळे लावून बसण्यातच धन्यता मानली. बहुतेकांनी घरात बसून निकाल पाहणे, ऐकणे पसंत केले. त्यामुळे रस्त्यावर गटागटाने कोठे उभे राहून चर्चा करणारी माणसे कोठे तरीच तुरळक दिसत होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT