पश्चिम महाराष्ट्र

बिगुल वाजले... "या' महापालिकांच्या पोटनिवडणुकीचा मुहुर्त ठरला 

विजयकुमार सोनवणे


सोलापूर ः राज्यातील सहा महापालिकांतील सात जागांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. विविध कारणांनी या महापालिकांतील नगरसेवकांचे पद रद्द झाले होते. दरम्यान सोलापूर महापालिकेतील काही नगरसेवकांचे भवितव्य न्यायालयाकडे प्रलंबित आहे. त्याचा निकाल लागला तर सोलापूर महापालिकेतही पोटनिवडणुकीची शक्‍यता आहे. 

असा आहे निवडणूक कार्यक्रम 
पोटनिवडणूक जाहीर झालेल्या महापालिकांमध्ये नासिक (दोन जागा), मालेगाव, लातूर, पनवेल, नागपूर व बृहन्मुंबई (प्रत्येकी एक जागा) या महापालिकांचा समावेश आहे. त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला कार्यक्रम या प्रमाणे ः अधिसूचना जारी करणे (16 डिसेंबर 2019), आयोगाने निश्‍चित केलेल्या संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज दाखल करणे (16 ते 23 डिसेंबर, सकाळी 11 ते दुपारी दोन), उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा कालावधी (16 ते 23 डिसेंबर, सकाळी 11 ते दुपारी तीन, 22 डिसेंबरला सुटी असल्याने त्यादिवशी अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत), उमेदवारी अर्जांची छाननी (24 डिसेंबर, सकाळी 11 पासून), अर्ज मंजूर झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे (छाननी झाल्यावर लगेच), उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख (26 डिसेंबर 2019, दुपारी तीन वाजेपर्यंत), निवडणूक चिन्ह नेमून देण्याची तारीख (27 डिसेंबर, सकाळी 11 वाजता), निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी (27 डिसेंबर), मतदान (9 जानेवारी 2020, सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच), मतमोजणी (10 जानेवारी 2020, सकाळी दहापासून), विजयी उमेदवारांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे (13 जानेवारी 2020) 

सोलापूरच्या सहा नगरसेवकांचे भवितव्य अधांतरी 
सोलापूर महापालिकेतील सहा नगरसेवकांचे भवितव्य अद्याप अधांतरी आहे. एमआयएमचे नगरसेवक तौफीक शेख, कॉंग्रेसचे बाबा मिस्त्री, प्रवीण निकाळजे, भाजपच्या राजेश्री चव्हाण व शिवसेनेच्या अनिता मगर यांचे भवितव्य न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे. एमआयएमच्या नगरसेविका शहाजीदाबानो शेख यांचे सदस्यत्व कायम ठेवण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. कॉंग्रेसच्या अनुराधा काटकर यांच्यासंदर्भात काय करायचे याबाबत राज्य शासनाकडे महापालिका निवडणूक कार्यालयाने अभिप्राय मागविला आहे. शासनाचा निर्णय आल्यावर त्यांच्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT