पश्चिम महाराष्ट्र

वीजपुरवठा होतोय वारंवार "ट्रीप'

सकाळवृत्तसेवा

सोलापूर- महावितरणच्यावतीने शेतीपंपासाठी केल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. पाच-दहा मिनिटांनी वीजपुरवठा ट्रीप होत असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वीजपुरवठा कधी सुरू होतो व कधी बंद होतो, याची माहितीच शेतकऱ्यांना होत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. 

मागील आठवड्यापासून जिल्ह्यात शेतीपंपाच्या वीजपुरवठ्याची मागणी वाढली असल्याचे महावितरणच्यावतीने सांगण्यात आले. मागणी वाढल्यामुळे महावितरणने वीजपुरवठा दोन तासांनी कमी केला आहे. पूर्वी दिवसा आठ तास वीजपुरवठा केला जात होता. तो आता सहा तासांवर आणला आहे. मात्र, तो वीजपुरवठाही नियमितपणे दिला जात नाही. सहा तासांमध्येही चार व दोन तास असे विभाजन केले आहे. त्यामुळे वीजपुरवठा कधी सुरू होतो, हेच शेतकऱ्यांना कळत नाही.

वीजपंप सुरू केल्यानंतर पाच मिनिटातच वीजपुरवठा ट्रीप' होत असल्याने विहिरीतून आलेले पाणी वाफ्यामध्येही जात नसल्याचे शेतकरी सांगतात. रात्रीच्या वीजपुरवठ्याचे वेळापत्रकही पूर्णपणे बदलले आहे. 

रात्रभर द्यावे लागणार पिकाला पाणी 
यापूर्वी वीजपुरवठा रात्री 12 वाजता सुरू होऊन तो सकाळी दहा वाजता बंद होत होता. त्यामुळे पहाटेपासून पिकांना पाणी देणे सोईचे होते. मात्र, नव्या वेळापत्रकाप्रमाणे वीजपुरवठा रात्री आठ वाजून 40 मिनिटांनी सुरू होऊन सकाळी सहा वाजून 40 मिनिटांनी बंद होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर पिकाला पाणी देत बसावे लागणार आहे. जिल्ह्यात पाऊस नसल्याने विजेची मागणी वाढल्याचे कारण सांगून महावितरणचे अधिकारी मोकळे होतात. मात्र, त्याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागतो, याकडे ते जाणूनबुजून काणाडोळा करत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येते. 

विजेची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. शेतीपंपाच्या थकीत वीजबिलाची वसुली सुरू केली जाईल. 25 हजार थकबाकी असलेल्या ग्राहकांनी पाच तर 25 हजारापेक्षा कमी असणाऱ्या ग्राहकांनी तीन हजार रुपये भरावेत. - ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता, महावितरण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: केएल राहुलने जिंकला टॉस, लखनौ संघात मोठा बदल; जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT