पश्चिम महाराष्ट्र

आजरा - चंदगड सीमेवर हत्तीच्या कळपाचा वावर

सकाळवृत्तसेवा

आजरा - आजरा-चंदगड तालुक्‍याच्या जंगल परिसरात चार हत्तींचा कळप वावरत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ऊस, मेसकाठी यासह विविध पिकांचे कळप नुकसान करीत आहे. या आठवडाभरात कळपाने उसाचे मोठे नुकसान केले.

पोळगाव (ता. आजरा) येथील जानबा गुडुळकर यांचे एरंडोळ रस्त्यानजीक असलेल्या शेतातील उसाचे हत्तीने काल (ता. १०) मध्यरात्री मोठे नुकसान केले. दोन-तीन गुंठ्यातील ऊस कळपाने फस्त केला. मोडूनही टाकला आहे. यापूर्वीही त्यांच्या उसाचे कळपाने नुकसान केले. दोन हत्ती दिसल्याचे गुडुळकर यांनी सांगितले. यापूर्वी कासारकांडगाव व चितळे परिसरातील उसाचे कळपाने नुकसान केले. भावेवाडी येथील आनंदा भुतुर्ले, प्रकाश राऊत, बाळू राऊत, तानाजी राऊत यांच्या उसाचे नुकसान केले. हा कळप चंदगड व आजरा तालुक्‍यातील १० ते १२ गावांत वावरत आहे. त्याचा बंदोबस्त वन विभागाने करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

‘हत्तीप्रवण भागातील ऊस तोडा’
हत्तीप्रवण भागातील ऊस साखर कारखान्यांनी उचलावा, अशी मागणी भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. रोज हत्ती या भागात येऊन उसाचे नुकसान करतो. तरीही येथील ऊस उचलला जात नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

SCROLL FOR NEXT