wada
wada 
पश्चिम महाराष्ट्र

अश्लील कविता लिहिणा-या कवी दिनकर 'मनवर'वर गुन्हा दाखल करा 

सकाळवृत्तसेवा

वाडा - कवी दिनकर मनवर यांनी आदिवासी मुलींचा विनयभंग करणारी कविता लिहिली असून मुंबई विद्यापीठाने देखील कोणताही विचार न करता ती कविता बीएच्या तिसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत आता श्रमजीवी संघटना आक्रमक झाली असून, याच्या निषेधार्थ कवी दिनकर मनवर आणि बेजबाबदार विद्यापीठ प्रशासनाच्या निषेधार्थ आज श्रमजिवी संघटनेने वाडा तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढून याचा निषेध नोंदवला. 

या मोर्चाचे नेतृत्व श्रमजिवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव यांनी केले. मुंबई विद्यापीठाच्या बीए तिसऱ्या वर्षाच्या अभ्याक्रमात 'पाणी कसं अस्तं 'या शिर्षकाखाली प्रकाशित केलेल्या कवितेत आदिवासी मुलींची मानहानी करणारे, विनयभंग करणारे वर्णन आहे. या कवितेमुळे समाजात विशेषतः महिला वर्गात प्रचंड संताप व्यक्त होत असून आज श्रमजिवी संघटनेने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून कवी व विद्यापीठाचा निषेध नोंदवला. कवी दिनकर मनवर, विद्यापीठाचे कुलगुरू रविंद्र कुलकर्णी व पाठ्यपुस्तक निवड समिती यांच्या वर  अॅट्रासिटी, विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. महिला ठिणगी च्या गिता मोहनकर यांनी पोलिस ठाण्यात संबंधिताविरोधात फिर्याद दाखल केली. तसेच तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.   

दरम्यान, येत्या सोमवारी मुंबई विद्यापीठावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी श्रमजिवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव यांनी मोर्चात बोलताना दिला. 

या मोर्चात श्रमजिवी संघटनेचे तालुका अध्यक्ष जानु मोहनकर, मनोज काशिद,मिलिंद थुले, रविंद्र चौधरी, बाळाराम पाडोसा आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

दरम्यान, आदिवासी युवा संघटनाही आक्रमक झाली असून येत्या आठ दिवसात संबंधितावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे. पोलिस ठाणे व तहसीलदार कार्यालयात या संदर्भात निवेदन देण्यात आले. 

मोर्चातील मागण्या 
सदर कविता मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात तात्काळ वगळण्यात यावी. कवी दिनकर मनवर यांच्यासह कविता संग्रह प्रकाशित करणारे प्रकाशक,मुंबई विद्यापीठाच्याअभ्यासक्रमात समाविष्ट करण्यास जबाबदार असणा-या संबंधित शिक्षण अधिका-यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा नुसार गुन्हा दाखल करा. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे. सर्व दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. या मागण्या करण्यात आल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT