महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांवर नजर  sakal
पश्चिम महाराष्ट्र

महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांवर नजर

कोगनोळी सीमा तपासणी नाका : पोलिसांचा बंदोबस्त कडक

सकाळ वृत्तसेवा

कोगनोळी : बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj)पुतळ्याची विटंबना झाली. त्याचे पडसाद बेळगाव व कोल्हापूर (Belgaum and Kolhapur)जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उमटले. बेळगाव जिल्ह्यात अनेक गावात निषेध मोर्चे व बंद पाळण्यात आले. त्याचप्रमाणे सीमेलगत असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातही बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांवर अद्याप कडक नजर ठेवण्यात आली आहे.बेळगावमध्ये निघालेल्या निषेध मोर्चा व बंदला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील नेते जातील, या उद्देशाने सीमा तपासणी नाक्यावर नेत्यांना कर्नाटक प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या आधी महाराष्ट्रातील नेतेमंडळी कर्नाटकात असणाऱ्या कोगनोळी टोल नाक्यावर येऊन कर्नाटक सरकारचा निषेध करत. तसे आता न होण्यासाठी या ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या चारचाकी वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या वाहनांमधून मोर्चासाठी जाणाऱ्या नेतेमंडळींना परत महाराष्ट्रात पाठविण्यात येत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून बंदोबस्त कडक करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर निपाणीचे मंडल पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी, निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, कोगनोळी पोलिस उपठाण्याचे एएसआय एस. ए. टोलगी, एएसआय एस. आय. कंबार, पोलिस राजू गोरखनावर यांच्यासह पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT