today facebook 16th birhday
today facebook 16th birhday 
पश्चिम महाराष्ट्र

video : फेसबुक आलंय वयात... आज 16वा "बर्थ डे' 

अशोक निंबाळकर

नगर ः मी तुम्हाला ओळखतो. ते कसं? असं काय करता? मी आणि तुम्ही फेसबुक फ्रेंड्‌स आहोत. तुमच्या प्रत्येक पोस्टला माझं लाइक असतं. बऱ्याचदा मी ते शेअरही करतो... खरं तर आमची मैत्री फेसबुकवरचीच. तिकडंच आमचं जमलं... एक सांगू माझ्या बिझनेसचा सक्‍सेस मंत्रा? मी की नाही फेसबुकचा पुरेपूर वापर करतो बिझनेससाठी... असे कुठल्याही प्रकारचे संवाद तुम्हाला फेसबुकविषयी ऐकायला मिळतील. प्रेमप्रकरणापासून एखाद्या कलाकाराला व्यासपीठ मिळवून देण्याचंही काम फेसबुकने केलंय. 

मी तुमचा मित्र

आपल्या भारतात तशा शेकडो जाती-जमाती; पण त्यात भर पडलीय ती फेसबुक जमातीची. कारण, फेसबुक वापरणाऱ्यांची कॅटेगरीच वेगळी आहे, असं समाजशास्त्रज्ञ सांगतात. शेकड्याने नव्हे, तर तुम्हाला हजारोंनी मित्र-मैत्रिणी इकडे भेटतील. प्रत्यक्षात "मी तुमचा मित्र' असं कोणा एका मुलीला म्हणायला गेलात, तर ती तुमची मैत्री कबूल करणार नाही; परंतु फेसबुकवर अशी कोणतीच अडचण कोणालाच नसते. एकंदर, फेसबुकने मैत्रीतील अंतर संपवून टाकलंय. इथे कोणीही कोणाचा मित्र असू शकतो. केडगावातील किरणपासून कॅलिफोर्नियातील कॅंडीपर्यंत.

जीवनमानच बदलून टाकलंय

संपूर्ण जगातील लोकांचे जीवनमानच या फेसबुक नावाच्या ऍपने बदलून टाकलंय. फेसबुकवर उमटणाऱ्या प्रतिक्रियांतून काही हुशार लोक निवडणुका जिंकायला लागलेत. खरे तर ही सोशल नेटवर्किंग साइट आहे. तीही विनाशुल्क. त्यामुळे प्रत्येक जण फेसबुकवर असतोच. ज्याचे फेसबुकवर अकाउंट नाही, असा तरुण क्वचितच सापडेल. या नेटवर्किंग साइटमुळे अनेकांचे संसार उभे राहिले आहेत, हरवलेल्या व्यक्ती सापडल्या आहेत. हे सकारात्मक परिणाम दिसत असले, तरी त्याचे दुष्परिणामही भारतीय समाजव्यवस्थेवर झाले आहेत. अनेक मुलं व्यसनाधीन झाली आहेत. फेसबुकवरील मैत्रीमुळे अनेकांना आर्थिक गंडा बसला आहे. कोणी याचा वापर दुसऱ्याचे जीवन उद्‌ध्वस्त करण्यासाठीही केल्याची उदाहरणं आहेत. 

300 कोटी फोटो अपलोड 
प्रत्येक पाच सेकंदांना पाच नवीन लोक फेसबुक जॉईन करतात. देशविदेशातून तब्बल 300 कोटी फोटो अपलोड होत असतात. एका मिनिटाला 50 हजार कमेंट लिहिल्या जातात. तीन लाख स्टेटस अपडेट केले जातात. विशेष म्हणजे व्हॉट्‌सऍप आणि इन्स्टाग्रामही त्याच परिवारातील भाग आहे. सोशल मीडियात वावरणाऱ्यांपैकी 50 टक्के व्यक्ती फेसबुकचा वापर करतात. 70पेक्षा जास्त भाषांशी फेसबुक कनेक्‍ट आहे. 

भारतातील जन्म 
भारतात सर्वाधिक लोक फेसबुकवर आहेत. फेसबुकसाठी भारत ही सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. रूजी संघवी यांनी फेसबुकवर बातमी देण्याची संकल्पना पहिल्यांदा मांडली. भारतात फेसबुक आल्यानंतर शीला तंद्राशेखर कृष्णन यांनी पहिले अकाउंट उघडले. 

फेसबुकचा "बर्थ डे' 
समाजात अनेक जण असे आहेत, की त्यांना मित्रांचा जाऊ द्या; बायकोचाही "बर्थ डे' माहिती नसतो. अशा लोकांची कामे फेसबुक करते. चार-दोन दिवस आधीपासूनच ते सजग करते. वाढदिवसाच्या दिवशी हमखास आठवण करून देतो. त्या फेसबुकचाच आज "बर्थ डे' आहे. नुसताच "बर्थ डे' नाही, तर त्याचं सोळावं वरीस सरलं आहे. एका अर्थाने ते वयात आलंय. दुसरं म्हणजे ते वापरणारी मंडळीही. हे वरीस धोक्‍याचं मानलं जात असलं, तरी ते प्रगल्भतेकडे वाटचाल करणारं असतं. 

कसा झाला जन्म? 
फेसबुकचा जन्म मार्क झुकेरबर्ग या विद्यार्थ्याने लावला. तो हावर्डचा विद्यार्थी आहे. 4 फेब्रुवारी 2004 रोजी त्याने युनायटेड स्टेट्‌समध्ये हे फेसबुक जन्माला घातलं. अर्थातच त्याचे मित्रही या मोहिमेत होते. ही सोशल नेटवर्किंग साइट अल्पावधीच प्रसिद्धीस पावली. पूर्वी "द फेसबुक' या नावानं ते चालवलं जायचं. कालांतराने त्याच्या नावातील "द' निघून गेला. वर्षभरातच ते युरोपात पोचलं. 2006मध्ये त्याने भारतात धुमाकूळ घातला. एकमेकांशी संवाद साधता यावा, हा मार्कचा उद्देश होता. काही जण सांगतात, ही संकल्पना एका भारतीयाची आहे. यासह अनेक अफवा पसरवल्या जातात. काहीही असो; या फेसबुकने संपूर्ण जगावर कब्जा केला आहे आणि त्यांचे जीवनमानच बदलून टाकले आहे. असे असले, तरी चीन आणि उत्तर कोरियात मात्र फेसबुकच्या वापरावर बंदी आहे. 

झुक्‍याभाऊ शुभेच्छा

आज फेसबुकचा वाढदिवस असल्याने युजर्स त्याला शुभेच्छा देत आहेत. हे शुभेच्छा देण्याचे प्रकाही अजब आहेत. काहीजण त्याला ग्रामीण भागातील आपुलकीचे शब्दसुमनांनी शुभेच्छा पोस्ट करीत आहेत. झुक्‍याभाऊ तू दिलेली ही देणगी आपल्यासाठी मोलाची आहे, अशाही पोस्ट आज सकाळपासून फेसबुकवर पडत आहेत. काहीजणांनी त्यावर कविता केल्या आहेत. नगरच्या राहुल ठाणगे नावाच्या कवीने फेसबुक प्रेमावर केलेली ही कविताही दाद मिळवणारी आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT