devendra fadanvis
devendra fadanvis 
पश्चिम महाराष्ट्र

सदाभाऊ इस्लामपूर सांभाळा; फडणवीसांचे पत्राव्दारे आवाहन

सकाळवृत्तसेवा

सांगली ः माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सदाभाऊ खोत यांना पत्र लिहून "इस्लामपूर सांभाळा', अशा सूचना दिल्या आहेत.

इस्लामपूर शहरात कोरोना बाधितांची संख्या 25 झाली आहे. त्यामुळे या शहरात नियमांचे काटेकोर पालन होईल, यासाठी पुढाकार घ्या, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

श्री. फडणवीस यांनी लिहलेला पत्रात असे म्हटले आहे, की सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे कोरोनाग्रस्त 23 रुग्ण आढळून आले आहेत. संपूर्ण जग या समस्यांचा प्रभावी मुकाबला करीत आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारतसुद्धा अतिशय ताकीदने आणि गंभीरतेने या समस्येचा मुकाबला करत आहे. संपूर्ण राज्याचा दैनंदिन आढावा घेत असतानाच इस्लामपूर येथील परिस्थितीची सुद्धा माहिती मी घेत असतो. संबंधित प्रशासनाशी मी सातत्याने संपर्क ठेवून असून आपणसुद्धा आपल्या पातळीवर या कठीण प्रसंगात इस्लामपूरवासियांसाठी अधिक जोरकसपणे काम केले पाहिजे. प्रदेश पातळीवर आपल्याला काही मदत लागली तर तसे जरूर कळवावे. या कठीण समयी आम्ही सारे आपल्यासोबत आहोत. इस्लामपूरवासियांसोबत आहोत.

त्यात असेही म्हटले आहे, की यासोबतच मा. श्री. नरेंद्र मोजीजी यांनी जाहीर केलेल्या सर्व योजना गरजूंपर्यंत पोहोचतील, हेही आपण सुनिश्‍चित करावे. रुग्णसंख्या जववळजवळ 23 पर्यंत पोहचल्याने सोशल डिस्टसिंगच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी होईल, हा प्रयत्न करणेसुद्धा आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आपण सारे मिळून या संकटावर लवकरच मात करू, हा मला विश्‍वास आहे.

राज्य शासनाचा मात्र उल्लेख नाही

या संपूर्ण पत्रात श्री. फडणवीस यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख केला आहे. केंद्राच्या योजना लोकांपर्यंत पोहचवा, असेही म्हटले आहे. परंतू त्यांनी पत्रात राज्य शासनाच्या योजना, काम किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ओझरताही उल्लेख केलेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी तीन आरोपींना पोलीस कोठडी तर एकाला न्यायालयीन कोठडी

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT