Fake Currency Manufacturing In Belgaum
Fake Currency Manufacturing In Belgaum  
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावमध्ये 'येथे' तयार होत होत्या बनावट नोटा 

सकाळ वृत्तसेवा

रायबाग ( बेळगाव ) - कुडची येथे बनावट नोटा तयार करून त्या बाजारात खपविणाऱ्या टोळीचा बेळगावच्या डीसीआयबी व स्थानिक पोलिसांनी पर्दाफाश केला. त्यांच्याकडून 2 लाख 33 हजाराच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ही कारवाई गुरूवारी (ता. 14) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी परशुराम नाईक व जलाल दरुरवाले (दोघेही रा. कुडची) यांना ताब्यात घेण्यात आले असून मुख्य आरोपी फारूक पिरजादे हा फरार आहे.

याबाबत माहिती अशी, कुडची येथील फारुक पिरजादे उर्फ बाबा हा बनावट नोटा तयार करण्याच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. तो बनावट नोटा खपविण्यासाठी परशुराम नाईक व जलाल दरुरवाले (दोघेही रा. कुडची) यांच्याकडे देत होता. त्या नोटा बाजारात आणत असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी (ता. 14) परशुराम नाईक व जलाल दरुरवाले बनावट नोटा घेऊन महालिंगपूरकडे जात असल्याचीही माहिती मिळाल्याने जमखंडी रस्त्यावरील 3 किलो मीटर अंतरावर या दोघांना चौकशीसाठी थांबविले.

पानटपरीतून नोटा चलनात

अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे बनावट नोटा मिळाल्या. आरोपींना घेऊन ज्या ठिकाणी नोटा तयार केल्या जात होत्या, त्या ठिकाणी पोलिसांनी नेऊन पाहणी केली. तेथे 100, 200 व 500 रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या. तर काही नोटांची एका बाजूला छपाई केल्याचे पोलिसांना आढळले. मुख्य सूत्रधार फारुक पिरजादे हा पोलिसांना चकवा देऊन फरारी झाला आहे. या बनावट नोटा महालिंगपूर, बनहट्टी, जमखंडी, रायबाग, हारुगेरी येथे फळ विक्रेत्यांसह पानटपरीत चलनात आणल्या जात होत्या. 

डीसीआयबीचे निरीक्षक निंगनगौडा पाटील, कुडचीचे पोलिस उपनिरीक्षक जी. एस. उप्पार, आर. व्ही. पट्टणशेट्टी, एल. बी. गदाड, एल. टी. पवार, टी. के. कोलची, एम. आय. मुजावर, एस. एस. मग्गेण्णावर, एस. आय. पठाण, डी. एस. साळुंखे, के. आर. साळुंखे, जी. एच. होनवाड, एस. व्ही. हंजी, पी. ए. गडेकर यांनी ही कारवाई केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT