mangalwedha
mangalwedha 
पश्चिम महाराष्ट्र

कालव्यात पाणीच नसल्याने शेतकऱ्यांचा संताप

हुकूम मुलाणी

मंगळवेढा : उजनी कालव्याच्या लाभक्षेत्रात शेवटच्या टोकावर असलेल्या नंदूर परिसरातील शेतीला उजनीचेच पाणी मिळत नसल्यामुळे कालवा आहे, गावाला पण पाणी नाही शेतीला अशी अवस्था या भागातील शेतकऱ्यांची झाली आहे. पाण्याची मागणी करुनही याकडे संबंधित खात्याचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यातून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान भिमा पाटबंधारे खात्याचा दावा गावातील पाच तलाव भरुन दिल्याचा असला तरी प्रत्यक्षात मात्र दोनच तलाव अर्धवट भरले आहेत.

उजनीसाठी तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात जमीन संपादीत केली असून त्याप्रमाणे निश्चीत केलेले पाणीही मिळत नाही. डोणज व नंदूर येथीलही जमीन प्रकल्पग्रस्तांना देण्यात आल्या पण या भागातील शेतकऱ्यांना उजनी उजव्या कालव्यातील शाखा 9 चे पाणी नंदूर वितरिकेला मात्र पुरेशा प्रमाणात येत नाही. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरुनही पाणी न आल्याने खरीप हंगामातील पिके जळू लागली पाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या गावातील पहिल्या टप्यातील शेतीला पाणी मिळते तर शेवटच्या टोकावरील शेतकरी अजूनही पाण्याच्या प्रतिक्षेत असून पाणी मागणी करुनही लक्ष दिले नाही.

सध्या शेवटच्या टोकाला असलेल्या कालव्यात मोठी झाडे उगवली असून ती काढण्यासाठी देखील या खात्याकडून प्रयत्न होताना दिसत नाही. ठराविक शेतकऱ्यांना पाणी देऊन पाणी पोहोचल्याचा दावा करणाऱ्या या खात्याने किमान प्रत्यक्ष परिस्थिती पाहून तरी शेतकऱ्याच्या हिताचे काम करावे अशी प्रतिक्रिया या भागातील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. सध्या या गावातील सात तलाव असून परगोंडे तलावात पाणी सोडल्यास पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरीला व लगतच्या शेतील मोठ्या प्रमाणात लाभ होऊ शकतो, पण या तलावात पाणी सोडण्यासाठीची मानसिकता या खात्याची नाही. यापूर्वी स्वाभिमानी संघटनेच्या वतीने आंदोलनही करण्यात आले पण खात्याने आश्वासनावर बोळवण केली.

उजनी धरण भरले असले तरी कालव्यातील पाण्याने या गावातील सर्व तलाव भरुन द्यावे, तलाव भरुन दिल्याची खोटी माहिती सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करेल. 
- शंकर संघशेट्टी शाखाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

नुकत्याच सोडलेल्या उजनीच्या पाण्याने गावातील सर्व तलाव भरुन दिले आहेत पुढील पाळीत उर्वरित तलाव भरु देण्यासाठी प्रयत्न करु.
- पी.आर. कुलकर्णी अभियंता भिमा पाटबंधारे विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT