acb sakal
पश्चिम महाराष्ट्र

निपाणीत लाचलुचपत पथकाच्या धाडीने अधिकाऱ्यांमध्ये धास्ती

शहर विकास प्राधिकरणाचे कामकाज ऐरणीवर

अमोल नागराळे

निपाणी : येथील शहर विकास प्राधिकरण (City Development Authority)कार्यालयावर बुधवारी (ता. २९) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून(ACB) धाड पडल्याने शहर व परिसरातील सर्व सरकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारयांनी धास्ती घेतली आहे. अनेक वर्षानंतर शहरातील सरकारी कार्यालयावर लाचलुचपत प्रतिबंध खात्याच्या अधिकारयांनी केलेल्या कारवाईची चर्चा जोरात सुरु आहे.

निपाणीला(nipani) २०१८ मध्ये तालुक्याचा दर्जा मिळाला तरी जिल्ह्यात बेळगावनंतर मोठे शहर म्हणून शहराचा पूर्वीपासून लौकीक आहे. शहरातील बाजारपेठ मोठी व परिसर सधन असल्याने महसूल वसुलीचे व उलाढालीचे मु्ख्य केंद्र म्हणून याकडे पाहिले जाते. येथे तालुका कार्यालय होण्याच्या आधीपासून वेगवेगळ्या सरकारी खात्याची कार्यालये कार्यरत आहेत. त्यामुळे येथील वेगवेगळ्या सरकारी कार्यालयातील कारभाराची माहिती नागरिकांना आहे. शहरात शहर विकास प्राधिकरणासह उपनोंदणी, तहसील, सिटी सर्व्हे, तालुका पंचायत, नगरपालिका, गटशिक्षणाधिकारी, एपीएमसी, सीडीपीओ, बांधकाम कामगार, अन्न व नागरी पुरवठा अशी विविध महत्वाची सरकारी कार्यालये आहेत.उपनोंदणीसह, शहर विकास प्राधिकरण, तहसील अशी काही सर्वाधिक महसूल मिळवून देणारी कार्यालये आहेत. खरेतर वेगवेगळ्या कार्यालयातील कामकाजावर लोकांच्या तक्रारी आहेत. मात्र तक्रार मांडण्यासाठी पुढे येताना कोण दिसत नाही.

तीन वर्षापूर्वी लोकायुक्त अधिकारी करूणाकर शेट्टी यांनी पालिकेतील कामकाजावर छापा टाकला होता. त्यानंतर कोणत्याही कार्यालयावर धाड पडलेली नव्हती. बुधवारी (ता. २९) लाचलुचपत प्रतिबंध पथकाने शहर विकास प्राधिकारण कार्यालयावर धाड टाकल्याने या कार्यालयातील कारभार चव्हाट्यावर आला आहे. हे कार्यालय केवळ निपाणीसाठी नव्हे तर निपाणीसह चिक्कोडी, रायबाग, अथणी, गोकाक, हुक्केरी या तालुक्यासाठी कार्यरत आहे. जमिनीच्या एन-ए, ले-आऊटसह अन्य महत्वाची कामे चालणारया या कार्यालयातील धाडीने सर्वच खात्यातील अधिकारी, कर्मचारयांनी धास्ती घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lingayat Community : लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा हिस्सा मानू नका, सर्वोच्च संस्थेच्या आवाहनाने राजकारणात खळबळ

US Open 2025 : कार्लोस अलकाराजने जिंकला सहावा ग्रँड स्लॅम, जागतिक क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानी

Ganpati Visarjan 2025: 'फलटणला दगडफेक; १३ जणांना अटक', जिंती नाक्‍यावर दोन मंडळांच्‍या कार्यकर्त्यांचा राडा

Latest Marathi News Updates : पंतप्रधान मोदी उद्या पंजाबमधील पूरग्रस्त भागाचा करणार दौरा, आर्थिक मदतीची घोषणा करण्याची शक्यता

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा 'Avocado Paneer Toast', सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT