file a case of ransom;. MNS challenges the commissioner of Sangali 
पश्चिम महाराष्ट्र

हिंमत असेल तर खंडणीचे गुन्हे दाखल कराच; कुणी दिले आव्हान आणि का... वाचा

जयसिंग कुंभार

सांगली : वाहनांचे खोटे क्रमांक टाकून बीले उकळणे हाच महापालिका प्रशासनाचा हेतू असल्याचा आमचा आरोप आहे. आयुक्तांच्या खुलाशाने तेच सिध्द झाले आहे. हिंमत असेल तर जरुर आमच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करावेत. मात्र आयुक्तांची ही भूमिका लोकसेवकाला शोभणारी नाही अशी, टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, सरचिटणीस आशिष कोरी, संदीप टेंगलेयांनी आज केली. 

आयुक्‍त नितीन कापडणीस यांनी त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांवर रविवारी गुन्हे दाखल करणार असा इशारा दिला होता. यावर आज मनसेच्यावतीन पत्रकार परिषद घेवून पुढील प्रमाणे निवेदन करण्यात आले आहे. श्री. सावंत यांनी म्हटले आहे की, गतवर्षीच्या महापूर काळात केलेल्या कामाची कोट्यवधींची बीले खर्ची टाकण्यात आली आहेत. या सर्व कामांबद्दल माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या कागदपत्रांच्या आधारे मनसेच्यावतीने महापालिका प्रशासनावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्यावर आयुक्तांनी खुलासा करताना वापरलेले जेसीबी हजर करीत खुलासा केला होता. 

आयुक्त नजरचुकीने जेसीबी वाहनांचे क्रमांक चुकीचे पडल्याचे सांगतात. ते खरे नाही. हेतूपुर्वक वेगवेगळे क्रमांक दाखवून बीले टाकण्यात आली आहेत. चुक एकदा होऊ शकते. तब्बल 12 वेळा होऊ शकत नाही. आम्ही आत्ता फक्त जेसीबी वाहनांचे क्रमांक चुकीचे असल्याचे सिध्द केले आहे. अजूनही ट्रॅक्‍टरसह अन्य अनेक वाहनांबाबतही तेच असणार आहे. तेव्हाही ते असा दावा करणार का?

महापूरकाळात आम्ही पदरमोड करून आमच्या परीने मदतकार्य केले आहे. पगारी नोकर म्हणून नव्हे. तुम्ही केलेल्या कामांची जाहिरातबाजी आणि स्टंटबाजी न करता झालेल्या चुका मान्य करा. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करा. आम्ही न्यायालयात जाणार आहोतच. पण आम्हाला गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊ नका. ही लोकसेवकाची भाषा नाही. हिंमत असेल तर ते जरुर करा. आम्ही भ्रष्टाचाराचा पंचनामा करीतच राहू.'' 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RuPay Card Changes: RuPay कार्डधारकांना धक्का! 1 एप्रिलपासून नियम बदलणार; PNB-HDFC चा मोठा निर्णय

Pune News: ह्रदयद्रावक घटना! गावाला रस्ता नसल्याने वेळेवर मिळाले नाहीत उपचार, चिमुकल्याचा वाढदिवशीच करुण अंत..

IPL 2026 Marathi News: रोहित शर्मा Impact Player म्हणून खेळणार? सराव सुरू; मुंबई इंडियन्सची Playing XI कशी असणार?

Education Department: शिक्षण विभाग ‘मनोहर’वर मेहरबान; देवळी कला मारहाण प्रकरण, शिक्षकावर कारवाई केव्हा?

HPCL Jobs Alert: सरकारी नोकरीचा बंपर चान्स! डिप्लोमा ते CA उमेदवारांसाठी लाखोंच्या पगारासह HPCL मध्ये 700+ जागा, असा करा अर्ज

SCROLL FOR NEXT