Finally, no confidence motion against the Kande sarpanch  approved
Finally, no confidence motion against the Kande sarpanch approved 
पश्चिम महाराष्ट्र

अखेर कांदे सरपंचांविरोधात अविश्‍वास ठराव मंजूर

सकाळवृत्तसेवा

शिराळा : कांदे (ता. शिराळा) येथील भाजपाच्या लोकनियुक्त सरपंच सौ. सुवर्णा बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात मंजूर झालेल्या अविश्वास ठरावास संमती देण्यासाठी घेतलेल्या मतदानात सरपंचांविरोधात 792 -229 मतांने अविश्वास ठराव मंजूर झाला.

जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 व 2 येथे आज सकाळी 9.30 ते 11.30 पर्यंत सर्व मतदारांची विशेष ग्रामसभा होऊन 12 ते 5 पर्यंत गुप्त पद्धतीने मतदान झाले. दुपार पासून मतदानासाठी मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली होती. उपसरपंचासह 11 ग्राम पंचायत सदस्यांनी तहसीलदार गणेश शिंदे यांचेकडे अविश्वास ठरावा बाबत मागणी केली होती. 

विद्यमान सरपंच सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात. कर्तव्यात कसूर करतात. त्यांचे पती अनधिकृतपणे ग्रामपंचायतीच्या प्रत्येक कामात हस्तक्षेप करतात. गावच्या विकासामध्ये निरुत्साह दाखवून धनादेश जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवतात. त्यामुळे त्यांच्यावर अविश्वास दाखल करण्यासाठी पुढील कार्यवाही करावी आशा मागणीचे निवेदन उपसरपंच शशिकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य विश्वास पाटील, संग्रामसिंह पाटील,गजानन पाटील, विश्वनाथ पाटील, अर्चना पाटील, माधुरी पाटील,मनीषा कुंभार, अर्चना कुंभार, विमल कुंभार, शशिकला कांबळे यांनी तहसीलदार यांना दिले होते.

त्यानुसार तहसीलदार गणेश शिंदे यांनी ग्रामपंचायतची विशेष सभा घेतली त्यात 11-1 ने अविश्वास ठराव पारित करण्यात आला होता. पुढील कार्यवाहीसाठी अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आला होता.त्यानुसार विशेषग्रामसभेचे आयोजन करून गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. 

यावेळी तहसीलदार गणेश शिंदे,गटविकास अधिकारी डॉ.अनिल बागल यांची प्रमुख उपस्थिती होती. या मतदान प्रक्रियेसाठी 80अधिकारी व कर्मचाऱ्यांची नितुक्ती केली होती. तर बंदोबस्त साठी एक पोलीस अधिकारी 5 कर्मचारी होते. 

792 मतांनी अविश्वास ठराव मंजूर 

  • एकूण मतदान 3768 
  • झालेले मतदान 1039 
  • वैद्य मतदान 1021 
  • अवैद्य मतदान 18 
  • अविश्वास ठरावाच्या बाजूने 792 
  • अविश्वास ठरावाच्या विरुद्ध 229  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT