fish dead for polluted water in panchganga river kolhapur
fish dead for polluted water in panchganga river kolhapur 
पश्चिम महाराष्ट्र

व्हिडिओ - अजबच ; जेसीबीने काढला बंधाऱ्यावरील माशांचा खच 

सकाळ वृत्तसेवा

कुरुंदवाड(कोल्हापूर) ः प्रदुषण विरोधी कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे तेरवाड (ता. शिरोळ) येथील पंचगंगा नदी बंधाऱ्यावर प्रदूषित पाण्याने मृत्यमुखी पडलेले मासे भरुन नेण्यास इचलकरंजी पालिकेला भाग पडले. पालिकेच्या आरोग्य विभागाने जेसीबीच्या सहाय्याने मृत मासे भरून नेऊन त्याची विल्हेवाट लावली. शनिवारी काळ्या ओढ्यातील पाण्याचा विसर्ग थांबविण्यास भाग पाडल्यानंतर आज मृत मासे परत घेवून जाण्याची वेळ इचलकरंजी पालिकेवर आली. 

शनिवारी (ता 18)प्रांताधिकारी विकास खरात यांनी मुख्याधिकारी दिपक पाटील यांना कारवाईचा इशारा दिला होता. आज सकाळी बंधाऱ्यातील पाणी सोडण्याच्या दृष्टीने प्रशासन पाटबंधारे विभागाशी चर्चा करीत असतानाच प्रदुषण विरोधी कार्यकर्ते बंडू पाटील, विश्वास बालिघाटे आदिनी बंधाऱ्यातून पाणी सोडल्यास मृत मासे पात्रात जावून नांदणी धरणगुत्ती शिरोळ व पूढे नृसिंहवाडीत येतील व पंचगंगेबरोबरच कृष्णा नदीसुध्दा प्रदुषित होईल. त्यापेक्षा मृत मासेच येथून उचलून त्याची विल्हेवाट करा, अशी सूचना प्रांताधिकारी खरात यांना केली. त्यांना हा मुद्दा पटला व त्यांनी याची जबाबदारी इचलकरंजी पालिकेने उचलावी, असे आदेश दिले. त्याप्रमाणे पालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाचे पथक आले. त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने सुमारे तीन ट्रॉली भरुन मासे इचलकरंजी घनकचरा विभागात नेले व त्याची विल्हेवाट लावली. यावेळी बंडू पाटील विश्वास बालिघाटे योगेश जिवाजे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT