पश्चिम महाराष्ट्र

साताऱ्यात महामार्गावर पाच लाखांचा गांजा जप्त 

सकाळवृत्तसेवा

सातारा - सातारा शहराजवळील शिवराज पेट्रोल पंपाच्या परिसरात आज दुपारी पोलिस उपअधीक्षक कार्यालयाच्या पथकाने कार जप्त करत पळशी (ता. खटाव) येथील दोघांना अटक केली. या कारमधील पाच लाख रुपये किमतीचा 86 किलो गांजा जप्त करण्यात आला. 

कऱ्हाड येथून कारमधून साताऱ्याकडे गांजा नेण्यात येणार असल्याची माहिती परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक समीर शेख यांना मिळाली. त्यानुसार शेख व कर्मचाऱ्यांनी महामार्गावर पाळत ठेवली. दुपारी चारच्या सुमारास महामार्गावरून निघालेल्या कारचा (एचएच 11 वाय 3796) पाठलाग करून ती शिवराज पेट्रोल पंप परिसरात अडवण्यात आली. पोलिसांनी कारमध्ये असणाऱ्या दोघांना ताब्यात घेत कारची तपासणी केली. शंकर विलास जाधव व लक्ष्मण अंकुश जाधव (रा. पळशी, ता. खटाव) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. तपासणीत पोत्यामध्ये गुंडाळलेल्या पिशव्या सापडल्या. या पिशव्यांत गांजा ठेवला होता. पंच, वजन काटा, फॉरेन्सिक पथकाचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले. या पथकाने जप्त गांजाची तपासणी तसेच वजन केले. जप्त केलेल्या गांजाचे वजन 86 किलो असून, त्याची बाजारभावानुसार किंमत पाच लाख 20 हजार रुपये आहे. पोलिसांनी गांजा, कार, दुचाकी, दोन मोबाईल संच असा सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सातारा शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT