collector office.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोना पार्श्‍वभूमिवर पाच हजार कीट वाटणार 

सकाळवृत्तसेवा

सांगली-कोरोनामुळे संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील रोजंदारीवरील मजूर, निराधार, ऊसतोड मजूर, भटके, परराज्यातील मजूर, ज्यांच्याकडे रेशनकार्ड उपलब्ध नाही अशांना मदतीसाठी जिल्ह्यात 11 जीवनावश्‍यक वस्तुंच्या 5 हजार किटच्या वितरणाव्दारे 20 हजार गरजवंताना जिल्हा प्रशासनामार्फत स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून मदतीचे नियोजन करण्यात आले आहे, आजअखेर 1 हजार 775 किटचे वितरण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज दिली. 

मदत संकलनाचे व वितरणाचे नियोजन अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, उपजिल्हाधिकारी विजय देशमुख, तहसिलदार (पुरवठा) शिल्पा ओसवाल यांची टीम करत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर लॉकडाऊनमुळे हातावरचे पोट असणाऱ्या लोकांची जेवणाची सोय व्हावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. अशा लोकांना मदत करण्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, व्यापारी संस्था आदिंना मदतीसाठी आवाहन करण्यात आले असून जिल्हास्तरावर मदत स्वीकृती केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

या माध्यमातून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सकल जैन समाज सांगली, राधेकृष्ण एक्‍सस्टेशन प्रा. लि., इंडियन रेडक्रॉस सोसायटी, हेमंत महाबळ, मनोहर हनुमानबगस सारडा यांनी जीवनावश्‍यक वस्तुंचे किट प्रशासनाला दिले आहेत. प्रत्येक किटमध्ये 4 व्यक्तींच्या कुटुंबाला 10 दिवस पुरेल एवढ्या जीवनावश्‍यक वस्तुंचा समावेश आहे. यामध्ये गव्हाचे पीठ, तांदूळ, साखर, चहा पावडर, तिखट, मिठ, तेल, डाळी, साबण यासह सुमारे 11 जीवनावश्‍यक वस्तुंचा समावेश आहे. सुमारे 750 रूपये किंमतीच्या या किटची पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते सोमवारपासून वितरणाची सुरूवात झालीे आहे. पाच हजार किटच्या माध्यमातून 20 हजार गरजू व्यक्तींपर्यंत मदत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

तालुकास्तरावरही तहसिलदार यांनी नियोजन करून अद्यापर्यंत सुमारे 2 हजार जीवनावश्‍यक वस्तु किटचे वितरण केले आहे. 
गरजवंताना मदत करण्यासाठी ज्या दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, व्यापारी, व्यापारी संस्था, अशासकीय संस्था, सहकारी संस्था व इतर व्यक्ती यांची इच्छा आहे. त्यांनी जिल्हास्तरीय मदत स्वीकृती केंद्र व जिल्हा नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्रमांक व टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. त्यांनी देऊ केलेली मदत गरजू व्यक्तीपर्यंत देण्याची दक्षता जिल्हा प्रशासनामार्फत घेण्यात येत आहे. 

संपर्क साधा- जिल्हास्तरीय मदत स्विकृती केंद्र व जिल्हा नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक 0233-2600500, मोबाईल क्रमांक 8208689681, टोल फ्री क्रमांक 1077, तालुका नियंत्रण कक्ष मिरज 0233-2222682, शिराळा 02345-272137, 9922447812, 9359807492, वाळवा 02342-222250, 9423335135, 7350202617, पलूस 02346-226888, 9403683444, 7387654331, कडेगाव 02347-243122, 8275917674, 7972947452, तासगाव 02346-250630, 8482876900, कवठेमहांकाळ 02341-222039, 9823541428, 9834618823, खानापूर 02347-272626, आटपाडी 02343-221624, 7387437462, जत 02344-246234, 9763287777. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Maharashtra Sugar Season 2026 : साखर कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वीही सुरू करा, विरोध डावलून शासनाकडून परिपत्रक जारी; नवा संघर्ष पेटण्याची शक्यता

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Pune MLC Election: शिक्षक, पदवीधर’ची आजपासून रणधुमाळी ;दोन दिवसांत जागा वाटप; सहा ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT