

Uddhav Thackeray internal conflict kolhapur
esakal
Kolhapur Shiv sena Thackeray Group : शिवसेना ठाकरे पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने मोबाईलवर ठेवलेले वादग्रस्त स्टेटस आज शहरात चर्चेचा विषय ठरले. ‘उद्धवरावांची उद्ध्वस्त सेना’ असा मजकूर आणि वाघाच्या बछड्याला बाटलीतून पाजण्यात येणाऱ्या दुधाचे चित्र असलेल्या या स्टेटसमुळे एकच खळबळ उडाली. काही मिनिटांतच संबंधित पदाधिकाऱ्यांनी हे स्टेटस हटवले. पण, त्याची दिवसभर चर्चा सुरू होती.