IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

Ricky Ponting: आयपीएलच्या पदार्पणातच कूपर कॉनोलीने शानदार खेळी करत पंजाब संघाला विजय मिळवून दिला. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात संघ अडचणीत असताना त्याने नाबाद ७२ धावा करत सामन्याचा चेहरामोहरा बदलला.
Ricky Ponting

IPL 2026

sakal

Updated on

IPL 2026: आयपीएलच्या पदार्पणातच पंजाब संघाचा तारणहार ठरणाऱ्या ऑस्ट्रेलियन कूपर कॉनोली याने या खेळीसाठी तयार झालेल्या मानसिकतेचे श्रेय प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांना दिले. काही झाले तरी वर्चस्व गाजव, असा सल्ला त्यांनी मला दिला होता, असे सांगणाऱ्या कॉनोली याने संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरकडूनही आपल्याला बरेच काही शिकायचे आहे, असे मत व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com