KOP20J54896.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

झेंडू बागेतील फुले टाकली रस्त्यावर 

संजय कुंभार

दुधोंडी,  ः  सांगली  पाडवा व लग्नसराईचे दिवस पाहून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बॅंकेकडून कर्ज काढून दोन एकर झेंडूची शेती केली होती. दिवसाकाठी 30 ते 35 हजार रुपयांचा तोडाही होत होता.

मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या तरी मार्केट बंद असल्याने झाडांना इजा होऊ नये म्हणून उमललेली फुले तोडून रस्त्यावर टाकायची वेळ येत आहे. या दिवसात खरेतर झेंडूच्या फुलांना चांगला दर असतो. सरासरी 80 रुपये पर्यंत दर असतो, मात्र कोरोनामुळे आलेली फुले तोडून टाकून देण्याची वेळ आली आहे.

दोन एकरांत जवळपास आमचे साधारण पाच लाखांपर्यंत नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. गुढीपाडवा व लग्न हंगामात झेंडूला चांगला दर मिळेल या अपेक्षेने फूल शेती केली पण कोरोनाने आमचे मोठे नुकसान केले. फुलाची झाडे टिकविण्यासाठी व पुढील कळ्या उमलण्यासाठी उमललेली फुले तोडून टाकण्याशिवाय आम्हाला पर्याय उरला नाही. 

कोट 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऐन सणासह लग्न हंगामही धोक्‍यात आल्याने व बाजारपेठा बंद आहे. त्यामुळे झेंडूच्या मालाला उठावच नाही. फूल उत्पादक शेतकऱ्यांचा हंगाम वाया गेला आहे. माझ्यासारखे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

विजय जाधव, 
झेंडू उत्पादक शेतकरी दुधोंडी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Compensation Rule: महाराष्ट्रात अतिवृष्टी मदतीत मोठा बदल! सर्व पशुपालकांना नुकसान भरपाई मिळणार; ‘मर्यादा’ पूर्णपणे रद्द

Pune News: पिंपळवंडीत अघोरी पूजेचा प्रकार?; स्मशानभूमीत जळत्या चितेवर टाकले मृत कोंबडे, जुन्नर तालुक्यातील धक्कादायक प्रकार!

Vaibhavwadi Theft case : धक्कादायक! वैभववाडीत बंद बंगला फोडला, चक्क चोरट्यांनी दोन गॅस सिलिंडर चोरले

MI vs KKR सामन्यावर पावसाचं सावट? काय आहेत हवामान अंदाज अन् कसा राहिलाय दोन्ही संघाचा रेकॉर्ड?

Mobile Storage Tricks : सतत मोबाईलचं स्टोरेज फुल्ल होतंय? फ्रीमध्ये मिळेल जास्त स्पेस, एकदा वापरुन तर बघा 'ही' १ सोपी ट्रिक

SCROLL FOR NEXT