पश्चिम महाराष्ट्र

लाखावर पर्यटकांनी कासवर पाहिली फुले! 

सकाळवृत्तसेवा

कास - जागतिक वारसास्थळ आणि पुष्प पठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या कास पठाराचा यावर्षीचा हंगाम समाप्त केला असल्याची माहिती कास कार्यकारी समितीचे अध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी दिली. दोन सप्टेंबरपासून हंगामाची अधिकृत सुरवात करणाऱ्या समितीने या वर्षी चांगले केलेले नियोजन आणि सोयीसुविधांमुळे दीड महिन्यात 98 हजार 156 पर्यटक, तर तीन हजार 806 शालेय विद्यार्थ्यांनी कास पठारावर येऊन येथील फुलांचा गालिच्छा अनुभवल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले. 

ऑनलाइन बुकिंग 16 ऑक्‍टोबरपासून बंद केले असले, तरी पांढऱ्या कमळांसाठी प्रसिद्ध असणारा कुमुदिनी तलावात अजून फुले असल्याने पठारावर बुकिंग करून ही फुले अजून थोडे दिवस पाहता येणार आहेत. 

सप्टेंबरमध्ये परतीचा पडलेला अल्प पाऊस व ऑक्‍टोबर "हीट'चा तडाखा यामुळे कासची फुले लवकरच कोमेजली. अधूनमधून पाऊस पडत राहिला असता तर हाच हंगाम ऑक्‍टोबरअखेरपर्यंत राहिला असता. फुलांनी लवकर निरोप घेतल्याने हंगामाच्या शेवटी उमलणारी काही दुर्मिळ फुले पाहण्याची संधी पर्यटकांना गमवावी लागली, तरीही दीडच महिन्यात एक लाखाच्यावर बुकिंग केलेले पर्यटक, तर स्थानिक व बुकिंग न केलेले पर्यटक पाहिले, तर हाच आकडा सव्वालाखाकडे गेला असल्याचा अंदाज आहे. 

कास पठारावर जून महिन्यापासूनच फुले यायला सुरवात होते. जून ते ऑगस्टच्या शेवटापर्यंत सततच्या पावसाने फुले मोठ्या प्रमाणात बहरली नाहीत. त्यामुळे हंगामाची अधिकृत सुरवात दोन सप्टेंबरपासून करण्यात आली. या वर्षीच्या लहरी पाऊस व हवामानाचा फटका बसल्याने कासच्या फुलांची संख्या मात्र घटत चालल्याची तक्रार अनेक पर्यटक व तज्ज्ञांनी व्यक्त केली. कास पुष्प पठारावर फुले कमी असोत, की जास्त; परंतु लाखभर पर्यटकांच्या माध्यमातून पठाराने उत्पन्नाची मात्र कोटीचे उड्डाण यावर्षीही  केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..."

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

SCROLL FOR NEXT