forest guard no more in atpadi accident 
पश्चिम महाराष्ट्र

ब्रेकिंग - आटपाडीत झालेल्या अपघातात वनरक्षक ठार तर वनपाल गंभीर जखमी...

सकाळ वृत्तसेवा

आटपाडी - आज सायंकाळी येथील जवळे मल्टीपर्पज हॉलच्या समोर मोटर सायकल आणि टेम्पोच्या झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला. मयताचे नाव गणेश दत्तात्रय पाटील (वय ३२) रा.गळवेवाडी असे असून तो येथील वनीकरण विभागामध्ये वनरक्षक पदावर कार्यरत होता. ही घटना सायंकाळी पाच वाजता घडली. बायपास रोडवरील जवळे मल्टीपर्पज हॉल समोर हा भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की एक जण जागीच मृत्यू झाला. तर वनपाल पांडुरंग बालटेचे गंभीर जखमी झाले आहेत. 

येथील वनीकरण विभागामध्ये गणेश पाटील व पांडुरंग बालटे कार्यरत आहेत. सायंकाळी ते साई मंदिर रोडकडून आटपाडीकडे दुचाकीवरून निघालेले होते. यावेळी  मल्टीपर्पज हॉल जवळ सुमो गाडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांची दुचाकी समोरून येणाऱ्या टेम्पोच्या मागील बाजूला धडकली. धडक इतकी भीषण होती की, यामध्ये गणेश पाटील व पांडुरंग बालटे बाजूला लांबवर फेकले गेले. यावेळी बघ्यांनी प्रचंड गर्दी केली. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी हलवले परंतु अपघातामधील गणेश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला होता. यावेळी ग्रामीण रूग्णालयासमोर नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.                  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT