Former JDS MLA senior leader Prof. Sharad Patil Passed Away esaka
पश्चिम महाराष्ट्र

कर्करोगाशी झुंज अपयशी! माजी आमदार, ज्येष्ठ नेते प्रा. शरद पाटील यांचं वयाच्या 80 व्या वर्षी निधन

दोन वर्षांपासून त्यांची घशाच्या कर्करोगाशी (Cancer) झुंज सुरू होती.

सकाळ डिजिटल टीम

माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग, देवेगौडा, समाजवादी नेते ना. ग. गोरे, प्रा. एस. एम. जोशी, ग. प्र. प्रधान, मधू दंडवते यांच्या सहवासात ते घडले.

सांगली, कुपवाड : मिरजेचे माजी आमदार, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (JDS) प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद रामगोंडा पाटील (वय ८०) यांचे आज निधन झाले. दोन वर्षांपासून त्यांची घशाच्या कर्करोगाशी (Cancer) झुंज सुरू होती. तीन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली. रुग्णालयातून काल त्यांना घरी आणले होते.

बुधवारी पहाटे त्यांनी (Sharad Patil) येथील सिद्धार्थनगरातील निवासस्थानी अखेरचा निरोप घेतला. सकाळी त्यांच्या निधनाची बातमी समजताच कुपवाडमधील सार्वजनिक व्यवहार बंद ठेवून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. सामान्यांचा हक्काचा सच्चा नेता हरपल्याची भावना सर्वस्तरातून व्यक्त झाली.

सायंकाळी चारच्या सुमारास कुपवाड स्मशानभूमीत पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी हजारोंच्या जनसमुदायाने त्यांना साश्रूपूर्ण निरोप दिला. अखेरच्या श्‍वासापर्यंत जनसेवेत व्यस्त असलेला राजकारणी, समाजकारणी म्हणून प्रा. पाटील सदैव लक्षात राहतील. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. नातू प्रणव यांनी मुखाग्नी दिला. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २९) सकाळी ९ वाजता होणार आहे.

इंग्रजीचे विद्यार्थिप्रिय प्राध्यापक, कुपवाड वृद्धाश्रमासह विविध सामाजिक संस्थांचा आधारवड, यशवंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशी राजकीय परिघाबाहेरची त्यांची ओळख होती. विधानसभेत दोन टर्म व विधान परिषदेतील एक टर्मसह एकूण १६ वर्षे त्यांनी आमदार म्हणून प्रतिनिधित्व करताना दलित, अल्पसंख्याक, शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न हिरीरीने मांडले. समाजवादी मुशीतील प्रा. पाटील यांनी अखेरपर्यंत पुरोगामी विचारानेच राजकारण केले. जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजारामबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राजकीय प्रवास करताना १९७९ मध्ये तत्कालीन ‘पुलोद’तर्फे ते जि. प.त तर पंचायत समितीला ज्येष्ठ नामदेवराव मोहिते विजयी झाले होते.

माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग, देवेगौडा, समाजवादी नेते ना. ग. गोरे, प्रा. एस. एम. जोशी, ग. प्र. प्रधान, मधू दंडवते यांच्या सहवासात ते घडले. जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी दीर्घकाळ जबाबदारी सांभाळली. सांगली जिल्ह्यात तत्कालीन आमदार संभाजी पवार आणि व्यंकाप्पा पत्कींसह त्यांनी जनता दलाचा चांदोली ते उमदी असा विस्तार केला. नागनाथअण्णांसह त्यांनी दुष्काळी भागाच्या पाणी चळवळीत त्यांनी सहभाग घेतला. त्यांची कार्यालये प्रत्येकासाठी हक्काचे ठिकाण होते. त्यांच्या या लोकसंग्रहाचे दर्शनच जणू आज त्यांच्या अंत्ययात्रेत दिसले. पहाटेपासून सायंकाळपर्यंत रीघ लागली होती. टाळ-मृदुंगाच्या गजरात निघालेल्या अंत्ययात्रेत हजारोंचा जमाव होता.

शरद पाटील अमर रहेच्या जयघोषात सिद्धार्थनगर भाग, जैनगल्ली, चावडी, गाव भाग सोसायटी चौक, देशभक्त आर. पी. पाटील हायस्कूल परिसरातून फुलांच्या वर्षावात अंत्ययात्रा सायंकाळी चार वाजता स्मशानभूमीत पोहचली. तेथे बंदुकीच्या फैरी झाडून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सायंकाळी अंत्यसंस्कारास राज्य शासनाच्या वतीने मिरजेचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, सांगलीचे अपर तहसीलदार अर्चना पाटील, कुपवाडचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील, उपनिरीक्षक विश्वजित गाडवे, राखीव पोलिस दलाचे मणीलाल पवार, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, भाजपचे नेते पृथ्वीराज पवार, माजी महापौर संगीता खोत.

तसेच विठ्ठल खोत, गजानन मगदूम, शेडजी मोहिते आदी उपस्थित होते. तत्पूर्वी दुपारी बारापर्यंत माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार नितीन शिंदे, दिनकर पाटील, रावसाहेब पाटील, सी. आर. सांगलीकर, डॉ. रियाज मुजावर, उद्योजक रमाकांत घोडके, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, माजी मंत्री सदाभाऊ खोत, अकुज ग्रुपचे अण्णासाहेब उपाध्ये आदींनी अंत्यदर्शन घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT