Former President of Zilla Parishad Sangram Singh Deshmukh criticism on cm sangli political news 
पश्चिम महाराष्ट्र

तर दुकानाची कुलपे काढू; संग्रामसिंह देशमुखांचा इशारा

संतोष कणसे

कडेगाव ( सांगली) : मुख्यमंत्री क्वारंटाईन झाले आहेत.त्यामुळे राज्यात माझं कुटूंब माझी जबाबदारी,तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी असेच चित्र सध्या पहायला मिळत आहे असा टोला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना येथे पत्रकारांशी बोलताना लगावला.

ते म्हणाले,राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढतोय. त्यामुळे राज्य शासनाने केवळ वाहतूक वगळता सर्व  ठिकाणी निर्बंध घातले आहेत.यामुळे छोटे उद्योग,व्यवसायांवरती अन्याय झाला आहे. तेव्हा लॉकडाऊन  निर्बंध शिथिल करण्याबाबाबत 
सोमवारपर्यंत (ता.12) निर्णय झाला नाही तर दुकानाची कुलपे काढण्यात येतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल सर्व व्यापारीवर्गात असंतोष निर्माण झाला आहे.सरकारने सर्व व्यापार्‍यांना नियम,अटी घालून दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी. याबाबत तात्काळ निर्णय न झाल्यास व्यापाऱ्यांचा उद्रेक होईल.आपत्कालीन काळात मदत,अनुदान दिले तर कोरोना नियमाचे पालन होण्यास मदत होईल.असेही देशमुख म्हणाले.यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाराम गरुड,पंचायत समितीच्या सभापती मंगल क्षीरसागर, भाजपचे कडेगाव तालुकाध्यक्ष धनंजय देशमुख आदी उपस्थित होते. 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT