Founder of Indian circus Vishnupant Chatre 
पश्चिम महाराष्ट्र

हा होता हिंदुस्थानातल्या पहिल्या सर्कशीचा निर्माता

सदानंद कदम

1846 मध्ये अंकलखोपला जन्मलेल्या या विष्णुपंतांचं म्हणावं असं आज त्यांच्या गावी काहीही नाही. 

गाण्याची आणि प्राण्यांची आवड असलेल्या विष्णुपंतांनी सुरवातीच्या काळात नोकरी केली ती रामदुर्ग संस्थानात. तीसुद्धा चाबुकस्वाराची. पुढे अवघ्या तीन रुपये पगाराची ती नोकरी सोडून ते ग्वाल्हेरला संगीत आणि गायनाचे धडे गिरवण्यासाठी गेले. तिथं सरदार बाबासाहेब आपटे यांच्या अश्‍वशाळेत नोकरी पत्करली. बालपणापासून घोड्यांची आवड असलेले विष्णुपंत आता बाबासाहेबांच्या अश्‍वशाळेत अश्‍वविद्येचे धडे गिरवू लागले आणि संगीत गायनासाठी गुरूच्या शोधार्थ भटकू लागले. या भटकंतीत त्यांना गुरू सापडले ते ग्वाल्हेर घराण्याचे हद्दूखॉं साहेब. या गुरूंचे ते गंडाबंद शागीर्द झाले. त्यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवून विष्णुपंत महाराष्ट्रात परतले. आता ते जसे गायक झाले होते तसेच अश्‍वविशारदही. 
हे पण वाचा - या तालुक्याची द्राक्षे चाखतोय संपूर्ण देश

दरम्यान मुंबईत त्यांची गाठ पडली ती एका इंग्रजाशी. या गृहस्थाची स्वतःची सर्कस होती. विल्सन त्याचं नाव. ही सर्कस विष्णुपंतांनी पाहिली आणि त्यांची मूळची प्राण्यांविषयीची आवड उफाळून वर आली. अश्‍वतज्ज्ञ तर ते होतेच. विल्सनशी त्यांची गट्टी जमली. त्यांच्याही मनात असे प्राण्यांचे कसरतीचे प्रयोग करावेत असं आलं. पण विल्सन त्यांना म्हणाला, "भारतीयांना अशी सर्कस उभी करणं आणि प्राण्यांकडून कसरतीचे प्रयोग करून घेणं कदापिही जमणार नाही.' विल्सनचं ते बोलणं विष्णुपंतांना खटकलं आणि तिथंच त्याला ते म्हणाले,"याहून उत्तम अशी सर्कस मीच तुम्हाला उभी करून दाखवेन.' त्यांचे हे बोल त्यांनी खरे करून दाखवले आणि हिंदुस्थानातली पहिली सर्कस उभी राहिली. ग्रॅंड इंडियन सर्कस हे तिचं नाव. 

1882 च्या विजयादशमीला अवघ्या चार घोड्यांनिशी विष्णुपंतांनी सुरू केलेल्या या भारतातल्या पहिल्या सर्कशीनं कुर्डूवाडीच्या राजासमोर आपला पहिला खेळ सादर केला. विशेष म्हणजे या प्रयोगात विष्णुपंतांच्या सौभाग्यवतींनीही उंच झोपाळ्यावरच्या कसरती सादर केल्या. यथावकाश ही सर्कस भारतातच नव्हे तर परदेशातही आपले खेळ सादर करू लागली आणि पुढच्या काळात तर तिने विल्सनचीही सर्कस आपल्यात सामावून घेतली. विष्णुपंतांच्या या सर्कशीत महाराष्ट्रीय कसरतपटूंसोबत केरळचेही कसरतपटू काम करत होते. इतकंच नव्हे तर या सर्कशीत तिकीट देण्यासाठी आणि प्रेक्षकांना त्यांच्या जागा दाखवण्यासाठी स्वातंत्र्य चळवळीतील भूमिगत कार्यकर्ते राबत होते. 

1892 मध्ये विष्णुपंतांच्या सर्कशीचा मुक्काम होता काशी या धर्मक्षेत्री. तिथंच त्यांना त्यांचे गानगुरू हद्दूखॉं यांचे पुत्र रहिमतखॉं यांचं गाणं ऐकता आलं आणि त्यांनी आपल्या या लहरी गुरूबंधूला महाराष्ट्रदेशी आणलं. त्यांच्या गाण्याच्या मैफिलींनी या भूमीतल्या रसिकांचे कान तृप्त झाले. या रहिमतखॉंना विष्णुपंतांनी "भूगंधर्व' असा किताबही बहाल केला होता. त्यांचा अखेरपर्यंत सांभाळही केला. 20 फेब्रुवारी 1905 रोजी विष्णुपंत छत्रे हे जग सोडून गेले. मागे राहिली ती त्यांची "ग्रॅंड इंडियन सर्कस आणि रहिमतखॉं साहेब. पुढे या खॉं साहेबांचा सांभाळ करतच सर्कशीची धुरा सांभाळली ती पंतांचे धाकटे भाऊ काशिनाथ छत्रे यांनी. 

आज प्राण्यांच्या सांभाळावर आणि त्यांच्याकडून कसरतीची कामे करून घेण्यावर बंधनं आली असल्यानं आजच्या पिढीला सर्कशीची गंमत अनुभवता येत नाही. आता सर्कस असते पण तिच्यात वाघ, सिंह असे प्राणी आणि त्यांच्याकडून करून घेतलेल्या कसरती पाहायला मिळत नाहीत. अशा कसरती करून घेणाऱ्याला म्हणत रिंगमास्टर. आता असा रिंगमास्टर फक्‍त जुन्या चित्रपटातूनच पाहावयास मिळतो. पण हिंदुस्थानातला असा पहिला रिंगमास्टर आणि त्याची ती देशातली पहिली सर्कस ज्या अंकलखोपला होती तिथं आता त्या दोघांची कसलीही निशाणी उरली नाही. विष्णुपंत या मातीतले हेही आता तिथं सांगावं लागतं. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT